[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) भारत हा जगामध्ये सर्वात तरूण देश संबोधला जातो. हो, आपल्या देशात तरूणांची संख्या अधिक आहे आणि ही खूपच चांगली बाब आहे. परंतु, सध्या तरूणाई कॉम्युटर आणि मोबाईल गेमिंगचा अतिवापर वाढताना दिसून येत आहे. तासनतास एकाच जागी बसून मोबाईलवर राहिल्याने डोळे आणि मेंदूवर परिणाम होतोय. याशिवाय पाठ, खांदे आणि मणक्यात वेदना (सर्व्हायकल स्पाइन) ची समस्या वाढताना पाहायला मिळत आहे. सांधेदुखीमुळे बाह्यरूग्ण विभागात उपचारासाठी येणारे ६० टक्के रूग्ण हे ऑफिसमध्ये काम करणारे आहेत. कॉम्युटर आणि मोबाईलचा तासनतास उपयोग करावा लागत असल्याने त्यांना सांधेदुखीची तक्रारी जाणवत आहे. याबाबत डॉक्टरांचे निरीक्षण असून ओपीडीत येणाऱ्या रूग्णांमध्ये तरूणांची संख्या चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – iStock)
[ad_2]