( प्रगत भारत । pragatbharat.com)
Crime News: पाकिस्तानी-अमेरिकन 29 वर्षीय सानियाची तिच्याच पतीने गोळ्या घालून हत्या केली आहे. लग्नानंतर घटस्फोट झाल्याने 29 वर्षीय सानियाने सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर काही व्हिडीओ शेअर केले होते. पण यामुळे तिला आपला जीव गमवावा लागला. पाकिस्तानी-अमेरिकन 29 वर्षीय सानियाची तिच्याच पतीने गोळ्या घालून हत्या केली. सानियाच्या मृत्यूनंतर तिने केलेली शेवटची पोस्ट व्हायरल झाली होती. यात तिने लिहिलं होतं की, “ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता, त्याच्यापासून वेगळं होणं फार वेदनादायी असतं. पण त्यापेक्षा जास्त वेदना तेव्हा होतात जेव्हा तुम्ही अशा व्यक्तीशी प्रेम करता जो पूर्णपणे बेजबाबदार असतो”.
सानियाचं कुटुंब मूळचं पाकिस्तानचं आहे. पण नोकरीमुळे तिचे वडील फारुख खान चट्टनूगा शहरात राहत होते. सानियाने तिथेच चट्टानूगा स्कूल ऑफ आर्ट्स अँड सायन्समधून आपलं पदवी शिक्षण पूर्ण केलं. अभ्यासात हुशार असणाऱ्या सानियाचं आयुष्य एकदम व्यवस्थित सुरु होतं. पदवी घेतल्यानंतर सानियाने टेनेसी विश्वविद्यालयातून पुढील शिक्षण घेतलं होतं.
याचवेळी 2016 मध्ये तिची भेट जॉर्जियाचा व्यावसायिक राहिल अहमदशी झाली. राहिलदेखील मूळचा पाकिस्तानचा होता. त्यांच्या मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं आणि पाच वर्ष एकमेकाला डेट केल्यानंतर त्यांनी 2021 मध्ये लग्न केलं. तेव्हा सानिा फोटोग्राफर म्हणून काम करत होती. याआधी तिने एअरहोस्टेस म्हणूनही काम केलं होतं. याशिवाय ती सोशल मीडियावर फार प्रसिद्ध होती.
सानियाचं युट्यूब चॅनेल आणि इंस्टाग्राम पेजदेखील होतं. टिकटॉकवर तिला 20 हजारापेक्षा जास्त लोक फॉलो करत होते. तिचे व्हिडीओंना फार लाईक्स मिळत होते. पण लग्नानंतर तिचं हेच सोशल मीडिया त्यांच्यातील भांडणाचं कारण ठरलं. New York Post च्या वृत्तानुसार, लग्नानंतर दोघांमध्ये सगळं काही सुरळीत सुरु होतं. दोघांचं कुटुंबही आनंदी होतं. पण सानियाने सतत बाहेर फिरणं आणि सोशल मीडियावर व्हिडीओ टाकणं याला त्याचा विरोध होता. सानियानो फोटोग्राफीही करु नये असं त्याचं म्हणणं होतं. सानिया लग्नांमध्ये फोटोग्राफी करायची.
यामुळे राहिल सोनियाला आपलं काम थांबवण्यास सांगत होता. पण सानियाचा मात्र याला स्पष्ट नकार होता. यामुळे अखेर प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं. अखेर 2022 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.
घटस्फोटानंतर सानियाची सोशल मीडियावर पोस्ट
घटस्फोटानंतर सानियाने सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यास सुरुवात केली होती. तिने टिकटॉकच्या माध्यमातून आपली खदखद मांडण्यास सुरुवात केली. सानिया खानच्या एका पोस्टनुसार, तिचं लग्न एक वर्षांपेक्षाही कमी टिकलं आणि पतीने तिला घटस्फोट दिला.
सानियाने एका पोस्टमध्ये लिहिलं होतं की, एका दक्षिण आशियामधील महिलेच्या रुपाने घटस्फोटानंतर आपण अयशस्वी झालो आहोत असं वाटतं. तिथे जॉर्जियात बसलेल्या राहिलला मात्र ही पोस्ट पाहिल्यानंतर राग आला होता. आणि त्यातूनच त्याने सानियाच्या हत्येचा कट आखला.
राहिल जॉर्जियापासून 700 किमी दूर स्ट्रीटवाइल येथे आला. याच ठिकाणी सानिया वास्तव्याला होती. तेथून तो सानियाच्या घरी गेला. तिथे दोघांमध्ये काही वेळ बोलणं झालं. यानंतर राहिलने आपल्याकडची पिस्तूल काढली आणि सोनियावर गोळी झाडली. यानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडून घेत आत्महत्या केली.
पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा सानिया शेवटच्या घटका मोजत होती. तिचा काही वेळातच मृत्यू झाला. दुसरीकडे राहिलही मृत्यूशी झुंज देत होता. पोलीस त्याला घेऊन रुग्णालयात गेले. पण उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. पोलिसांनी दोघांच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता त्यांना सगळा प्रकार लक्षात आला.