VIDEO: सरांना क्लासबाहेर बोलवले, बोलण्यात गुंतवून ठेवत 2 विद्यार्थ्यांनी झाडल्या गोळ्या, कारण…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मध्यप्रदेशः शिक्षकांवर दिवसाढवळ्या गोळीबार केल्याची घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील मोरेना भागात ही खळबळजनक घटना समोर आली आहे. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (Viral Video) कैद झाला असून आता सोशल मीडियावर (Social Media) हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दोन बाईकस्वारांनी शिक्षकावर कोचिंग सेंटरबाहरेच गोळ्या झाडल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ( 2 Students Shoot At Teacher Outside Coaching Center)

विद्यार्थ्यांनीच झाडल्या गोळ्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन विद्यार्थी बाईकवरुन आले होते. रस्त्याच्याकडेला दुचाकी थांबवून ते सुरुवातीचा शिक्षकासोबत बोलत होते. त्यानंतर बाईकच्या मागे बसलेल्या तरुणाने बंदूक काढून शिक्षकाच्या पोटात गोळी झाडली आणि भरधाव वेगाने निघून गेले. सध्या शिक्षकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

फीच्या मुद्द्यावरुन वाद 

पोलीस अधीक्षक अतुल सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ११- ११.१५च्या सुमारास आम्हाला या घटनेबाबत माहिती मिळाली. त्यानंतर शिक्षकाच्या कुटुंबीयांची चौकशी केल्यानंतर आम्हाला आरोपीविषयी माहिती मिळाली. दोन्ही आरोपी 3 वर्षांपूर्वी त्या कोचिंग क्लासमध्ये शिकत होते. मात्र त्यांनी क्लासची फी पूर्ण न भरल्यामुळं त्यांचे शिक्षकासोबत काही वाद होते. त्याच मुद्द्यावरुन दोन विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिस या प्रकरणी अधिक चौकशी करत असून दोघांचाही कसून शोध घेतला जात आहे. 

सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

या घटनेचा थरारा सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. व्हिडिओत दोन  तरुण बाईकवरुन येताना दिसत आहे. त्यानंतर एका बाजूला दुचाकी थांबवल्यावर शिक्षक त्यांच्याशी बोलायला येत आहेत. त्यांच्याशी बोलत असतानाच दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाने शिक्षकावर गोळी झाडली. त्यानंतर तो खाली कोसळला. 

दोघांकडे पिस्तूल आले कुठून?

पोलिसांनी दोघा आरोपींविरोधात तक्रार दाखल केली असून विद्यार्थ्यांविरोधात 307 कलमअंतर्गंत हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणी तपास करत असून दोन्ही आरोपी फरार आहेत. तसंच, दोघांकडे बंदूक कशी आली? याचाही शोध घेतला जात आहे. 

प्रेम प्रकरणातून दोघांची हत्या

प्रेमप्रकरणाच्या संबंधातून मुलीच्या घरच्यांनीच तिच्या प्रियकरासह तिचा जीव घेतला असल्याची घटना मध्यप्रदेशात घडली होती. शिवानी तोमर आणि राधेश्याम तोमर अशी मृतांची नावे आहेत. मुरैना जिल्ह्यातील रतनबसई गावात ही घटना घडली. दोघांचा जीव घेऊन त्यांचा मृतदेह मगरींनी भरलेल्या तलावात फेकून दिल्याने एकच खळबळ उडाली होती. 

Related posts