Chaturmas 2023 : यंदाचं चातुर्मास अतिशय विशेष! 44 सर्वार्थ सिद्धी, 5 पुष्य नक्षत्र आणि 9 अमृतसिद्धी योग, 5 महिने असलेल्या ‘या’ शुभ काळात दुर्मिळ उपाय केल्याने सुख, समृद्धी, शांती आणि नोकरीत प्रगती

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chaturmas 2023 : हिंदू धर्मात चातुर्माला अत्यंत महत्त्व आहे. आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशीला चातुर्मासाला सुरुवात होते. असं म्हणतात या काळात भगवान विष्णू हे क्षीरसागरात विसावतात. यंदाचं चातुर्मास अतिशय खास आहे. यंदा पाच महिने चातुर्मास असून या काळात  44 सर्वार्थ सिद्धी, 5 पुष्य नक्षत्र आणि 9 अमृतसिद्धी असा शुभ योगायोग जुळून आला आहे.

कधी सुरु होतोय चातुर्मास?

या वर्षी चातुर्मास गुरुवार 29 जून 2023 पासून सुरू होईल तर गुरुवारी 23 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. पंचांगानुसार चातुर्मास हा चार महिन्यांचा असतो. मात्र यंदा अधी महिना असल्याने यंदा चातुर्मास पूर्ण पाच महिन्यांचा असणार आहे. (chaturmas 2023  44 sarvartha siddhi 5 pushya nakshatra and 9 amrit siddhi yoga chaturmas 2023 date upay Ashadi Ekadashi 2023 june 29 Devshyani ekadashi)

यंदा चातुर्मास अतिशय शुभ 

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यंदाचा चातुर्मास अनेक अर्थांनी विशेष आहे. येत्या गुरुवारपासून सुरु होणाऱ्या चातुर्मास हा समाप्तीही गुरुवारी होणार आहे. हिंदू धर्मात गुरुवार हा भगवान विष्णूंचा आवडता दिवस आहे, अशी मान्यता आहे. त्याचबरोबर गुरुवारी एकादशी तिथीचं पठण करणे शुभ मानलं जातं.

चातुर्मासात दुर्मिळ योगायोग 

पंचांगानुसार यंदाच चातुर्मास अतिशय शुभ आणि दुर्मिळ योगाने समृद्ध आहे. या पाच महिन्यांमध्ये 44 सर्वार्थ सिद्धी योग, 5 पुष्य नक्षत्र आणि 9 अमृतसिद्धी असे शुभ संयोग जुळून आले आहे. या शुभ काळात अनेक कार्य यशस्वी होतात अशी मान्यता आहे. पण हिंदू धर्मानुसार चातुर्मासात मांगलिक कामांवर बंदी असते. 

चातुर्मासाचा काळ हा उपवास, ध्यान, तपश्चर्या, अध्यात्म साधना, सेवा, सत्संग आणि तीर्थयात्रा करण्यासाठी अतिशय शुभ असतो. चातुर्मासात ब्रज यात्रेला अतिशय महत्त्व आणि शुभ मानलं जातं. असं म्हणतात की, या काळात सर्व तीर्थ हे ब्रजमध्ये एकत्र वास करतात. 

चातुर्मासात या कार्यांवर बंदी 

या काळात लग्न, मुंडण-जनेऊ, घर बांधणे, गृह प्रवेश, नवीन वाहन खरेदी करणे, नवीन मालमत्तेची खरेदी-विक्री किंवा नवीन व्यवसाय सुरू करणे इत्यादी गोष्टी करण्यास बंदी असते. त्यामुळे कोणालाही ही सर्व कामं करायची असेल तर 28 जून 2023 पूर्वी पूर्ण करावीत. यानंतर 23 नोव्हेंबर 2023 ला देवूठाणी एकादशीला भगवान विष्णूचा जागर झाल्यानंतर या कामांसाठी शुभ मुहूर्त सुरु होणार आहे. 

धनसंपदा आणि प्रगतीसाठी ‘हे’ उपाय करा!

1 चातुर्मासात नोकरीत प्रगतीसाठी चप्पल, छत्री, वस्त्र, अन्न आणि कापूर दान करा. शंकर भगवान प्रसन्न होऊन तुमच्या सर्व समस्या दूर होतील. 

2  कर्जमुक्तीसाठी चातुर्मासात अन्न आणि गाय दान करा. या उपायाने पैसा मिळवण्याचा मार्ग मोकळा होऊन तुमचे अडकलेला पैसा मिळतील. 

3 शत्रू आणि कुंडलीत ग्रह अडथळे दूर करण्यासाठी या चातुर्मासात कोणत्याही धार्मिक ग्रंथाचा किंवा तुमच्या आवडत्या देवाच्या मंत्रांचा जप करा.

4 चातुर्मासात ब्रह्म मुहूर्तावर उठून सूर्याची उपासना केल्याने शक्ती आणि मान-सन्मानात वाढ होते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.) 
 

Related posts