बायकोला चप्पल काढायला सांगितल्याने अधिकाऱ्याने वयस्कर कर्मचाऱ्याला सर्वांसमोर काढायला लावले कपडे, त्यानंतर….

( प्रगत भारत । pragatbharat.com)

डॉक्टरांच्या चेंबरमध्ये प्रवेश करण्यापूर्वी विभागीय रेल्वे व्यवस्थापकाच्या (Divisional Railway Manager) पत्नीला चप्पल काढण्यास सांगणं रेल्वे रुग्णालयाच्या अटेंडंटला महागात पडलं आहे. पत्नीला चप्पल काढण्यास सांगितल्याचा विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना इतका राग आला की त्यांनी त्या कर्मचाऱ्याला कपडे काढायला लावले. इतकंच नाही, तर यावेळी कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होती. सर्वांदेखत आपला अपमान झाल्याने कर्मचाऱ्याची तब्येत बिघडली आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं. दरम्यान हे प्रकरण उजेडात येताच अटेंडंटच्या सहकाऱ्यांनी रुग्णालयाबाहेर कामबंद आंदोलनाची घोषणा केली आहे. 

धनबाद रेल्वे मंडळाच्या रेल्वे रुग्णालयात कर्चमाऱ्यांची ओपीडी सेवा बंद पाडली आहे. कर्मचाऱ्यांनी डीआरएमवर गंभीर आरोप केले आहेत. डीआरएमकडून दिली जाणारी वाईट वागणूक आणि अपमान यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप आहे. दरम्यान, एडीआरएम आशिष झा यांनी घटनास्थळी पोहोचून कर्मचाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. 

यावेळी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, डीआरएम कमल किशोर सिन्हा यांची पत्नी उपचारासाठी रेल्वे रुग्णालयात आली होती. यावेळी डॉक्टरांच्या चेंबरबाहेर अटेंडंट बसंत उपाध्याय कर्तव्यावर तैनात होते. यावेळी बसंत उपाध्याय यांनी डीआरएमची पत्नी आणि त्यांच्यासह आलेल्या व्यक्तीला चप्पल बाहेर काढण्याची विनंती केली. त्यावेळी डीआरएमच्या पत्नीने काही म्हटलं नाही आणि उपचारानंतर परत गेल्या. 

कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की, यानंतर डीआरएम कार्यालयातून अटेंडंड बसंत उपाध्याय यांना बोलावण्यात आलं आणि नंतर तिथे त्यांचा अपमान करण्यात आला. 

विभागीय व्यवस्थापकाच्या सांगण्यावरून त्यांच्या कर्मचाऱ्यांनी चप्पलच्या बदल्यात बसंत उपाध्याय यांचे कपडे काढले. या अपमानामुळे बसंत उपाध्याय मानसिक तणावात गेले होते. त्यामुळेच त्यांची प्रकृतीही बिघडली. यानंतर त्यांना उपचारासाठी रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नंतर चांगल्या उपचारासाठी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आलं. 

रेल्वे रुग्णालयात काम करणाऱ्या महिला अटेंडंट यशोदा देवी यांनी सांगितलं आहे की, आम्ही लोक येथे रुग्णांवर उपचार करण्यासाठी येतो. आज बसंत उपाध्याय यांचा अपमान झाला आहे. ज बसंत उपाध्याय यांच्यासोबत जे झालं ते उद्या आमच्यासोबत होऊ शकतं. यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी आंदोलक कर्मचाऱ्याची मागणी आहे.

दरम्यान, एडीआरएम आशीष झा यांचं म्हणणं आहे की, या प्रकरणी सध्या कोणीही साक्षीदार नाही आहे. कर्मचाऱ्यांनी ओपीडी सेवा बंद पाडली असल्याने प्रशासन सध्या सेवा सुरळीत करण्याच्या प्रयत्नात आहे. 

Related posts