Rashi Astro ashadhi ekadashi date muhurta puja vidhi in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ashadhi Ekadashi Date in Marathi : आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात. आषाढी एकादशी निमित्ताने वारींना सुरुवात होते. राज्यातील विविध भागांतून लाखों वारकरी पायी पंढरपूरला निघातात.  आषाढी एकादशी कधी आहे? आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी का म्हणतात? एकादशीचा मुहूर्त, पूजाविधी आणि महत्व काय हे जाणून घ्या. त्याचवेळी या दिवशी राशीनुसार दान करणे ही फायद्याचे ठरते. आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हटले जाते. काही ठिकाणी ही तिथी पद्मनाभा एकादशी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे महत्त्व अतिशय वेगळे आहे. विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेले वारकरी पंढरपुरात दाखल होतात. 

 आषाढी एकादशीचा मुहूर्त कधी?

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे आषाढी एकादशी गुरुवारी 9 जून 2023  रोजी साजरी करण्यात येईल. आषाढी एकादशीला प्रारंभ 29 जून 2023 रोजी पहाटे 3 वाजून 18 मिनिटांनी होईल. तर आषाढी एकादशी समाप्ती ही 30 जून 2023 रोजी पहाटे 2 वाजून 42 मिनिटांनी होणार आहे.

देवशयनी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी राशीनुसार दान केल्यास अनेक फायदे होतात असं मानलं जातं. याच संदर्भात ज्योतिष सुजीत जी महाराज यांच्याकडून जाणून घेऊयात कुठल्या राशीच्या व्यक्तीने काय दान करायला हवं.

मेष :  या राशीच्या लोकांनी आषाढी एकादशीच्या दिवशी अन्न दान करावे. आजच्या दिवशी कुठल्याही धार्मिकस्थळावर बेलाचे रोप लावावे, हे तुमच्यासाठी चांगले असते. तसेच गहू , गोड पदार्थही दान करु शकतात. रुग्णालयात खिचडी आणि फळे दान करु शकतात. 

वृषभ  :  वृषभ राशीच्या लोकांनी तांदूळ दान करावे. सुगंधी अगरबत्ती मंदिरात लावावी. सफेद कपडे कुठल्याही धार्मिक स्थळाच्या पुजाऱ्यांना दान करावेत. तसेच गायीला चारा किंवा चपाती तसेच गुळ खायला द्या. 

मिथुन  : या राशीच्या लोकांनी हिरवं वस्त्र दान करावे. गाईला हिरवा चारा द्यावा. धार्मिक पुस्तकांचे वितरण नागरिकांत करावे. ते तुमच्यासाठी चांगले असते.

कर्क  : या राशीच्या लोकांनी तांदूळ दान करावेत. सफेद किंवा पिवळे कपडे दान करणे लाभदायक असते. गायीला चारा द्यावा.

सिंह  : सिंह या राशीच्या लोकांनी व्यक्ती गहू दान करावे. तसेच तांब्याचा सूर्य बनवून मंदिरात दान करा.  श्री हनुमानाच्या मंदिरात लाल वस्त्र चढवावे.

कन्या  : या राशीच्या लोकांनी हिरव्या रंगाचे कपडे दान करावे. गायीला चारा द्यावा. मंदिरात घंटा चढवू शकतात आणि रुग्णालयात फळं देऊ शकता. 

तुळ  : या राशीच्या लोकांनी मंदिरात अगरबत्ती, कापूर चढवावं, सफेद कपड्यांचं दान लाभदायक ठरेल. सुगंधित अत्तर दान करावे. 

वृश्चिक  : वृश्चिक या राशीच्या लोकांनी गहू, मसुरची डाळ दान करावी. लाल कपडे दान केल्याने अनेक आजारापासून मुक्ती मिळेल.

धनु  :  धनु या राशीच्या लोकांनी चण्याची डाळ आणि केळं दान केल्यास सुख-समृद्धी प्राप्त होईल.  धार्मिक पुस्तकांचे वितरणही करु शकतात. गोड वस्तू मंदिरात द्याव्यात. 

मकर  :  या राशीच्या लोकांनी  तीळ आणि उडीद डाळ दान करावे. काळे कपडे आणि लोखंडी कढई दान करणेही चांगले. तसेच शनी मंदिरात जाऊन तेल वाहावे.

कुंभ  : या राशीच्या लोकांनी उडीद डाळ आणि काळे तीळ दान करा. गरिबांमध्ये काळे वस्त्र वितरित करा. तसेच विष्णु मंदिरात अन्न आणि पिवळे कपडे दान करावे.

मीन  : या राशीच्या लोकांनी चणाडाळ आणि फळं दान करावी. श्री विष्णु मंदिरात पिवळे कपडे द्यावेत.  

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

 

Related posts