Horoscope 2 July 2023 : नोकरीत प्रमोशन, व्यवसायात फायदा; ‘या’ राशीच्या व्यक्तींना अचानक होणार धनलाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Horoscope 2 July 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

मेष (Aries)

आजचा दिवस आत्मविश्वासपूर्ण राहील. पण आत्मसंयम ठेवा. मानसिक शांतीसाठी प्रयत्न करा. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. जास्त मेहनत घेण्याची तयारी ठेवा. भावंडांचे सहकार्य मिळे.

वृषभ (Taurus)

मन अस्वस्थ राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात आवड निर्माण होईल, पण शैक्षणिक कार्यात अडथळे येतील. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. अचानक खर्च वाढेल .सहलीला जाण्याचा योग येईल. 

मिथुन (Gemini)

रागावर नियंत्रण ठेवून शांत राहण्याचा प्रयत्न.  कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक नुकसान होईल. व्यवसायात बदल करावे लागतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात अपेक्षित यश मिळेल.

कर्क (Cancer)

आज काही बाबतीत मानसिक समाधान मिळेल. वाणीवर नियंत्रण ठेवा. मित्राच्या मदतीने व्यवसायात बदलाची संधी मिळू शकते. वडिलांकडून पैसे मिळू शकतात. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल.

सिंह (Leo)

आजचा दिवस आत्मविश्वास भरभरून राहील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. व्यावसायिक कामात अडचणी येऊ शकतात.पण मित्राची साथ मिळेल.आईकडून धन प्राप्त होईल.

कन्या (Virgo)

अति आत्मविश्वास दाखवू नका, नुकसान होईल. व्यवसायात यश मिळेल. परदेश दौर्‍याचा योग येईल. उत्पन्नात वाढ होईल. 

तूळ (Libra)

मन अस्वस्थ राहील. व्यवसायात अडचणी येऊ शकतात.आरोग्याचीही काळजी घ्या.अधिक धावपळ होईल.खर्चाचा अतिरेक होईल. 
जुन्या मित्रांची भेट होईल. 

वृश्चिक (Scorpio)

मित्राच्या मदतीने व्यवसायात  प्रगती करता येईल. कुटुंबात धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात. कपड्यांवरील खर्च वाढेल. स्वादिष्ट भोजनाची आवड निर्माण होईल.

धनु (Sagittarius)

मन अस्वस्थ राहील. महत्वाच्या कामात कुटुंबाचे सहकार्य मिळेल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मित्राच्या मदतीने उत्पन्न वाढू शकते. 

मकर (Capricorn)

मनही प्रसन्न राहील. पण, मुलाच्या आरोग्याच्या तक्रारीमुळे मन अस्वस्थ होऊ शकते. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. अज्ञात भीतीने त्रास होऊ शकतो.

कुंभ (Aquarius)

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. कामाचा व्याप वाढेल. वाहन सुखातही वाढ होऊ शकते. विनाकारण चिंता वाढू शकतात.

मीन (Pisces)

नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे.उत्पन्न वाढेल.अज्ञात भीतीने त्रास होऊ शकतो.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts