17 वर्षीय विद्यार्थिनीसोबत पळाली महिला टीचर, आंतरधर्मीय असल्याने वाद; म्हणाल्या- आमच्यामुळं दंगली करू नका

( प्रगत भारत । pragatbharat.com)

राजस्थानच्या बिकानेरमध्ये एक अत्यंत विचित्र घटना घडली आहे.  17 वर्षाच्या विद्यार्थीनीला घेऊन एक महिला शिक्षिका फरार झाली आहे. या दोघी आंतरधर्मीय असल्याने बिकानेरमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात love jihad चा देखील आरोप केला जात आहे. या दोघी फरार झाल्यानंतर हिंदूत्ववादी संघटनांनी अनेक ठिकाणी बंद देखील पाळला होता. मोठा वादंग उठला असतानाच या दोघींनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. आमच्यामुळं दंगली करू नका असं अवाहन त्यांनी या व्हिडिओतून केला आहे. 


Updated: Jul 4, 2023, 08:14 PM IST

Related posts