Prime Minister Narendra Modi Slams Congress In Rajsthan Bikaner Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PM Modit On Congress:   पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी बिकानेरमध्ये राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) प्रेमाच्या दुकानावर पलटवार केला आहे. शनिवारी (8 जुलै) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजस्थानच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी म्हटलं की, ‘काँग्रेस या देशामध्ये फक्त खोट्याचा बाजार करु शकते किंवा घोटाळ्यांचं दुकान उघडू शकते.’ 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलतांना म्हटलं की, ‘बिकानेर माझ्यासाठी खूप खास शहर आहे. तुमचा उत्साह सांगतो की राजस्थानमध्ये केवळ वातावरणाचा पारा चढला नाही तर काँग्रेसच्या सरकारच्या विरोधात जनतेचा देखील पारा चढला आहे. जेव्हा जनतेचा पारा चढतो तेव्हा सत्तेची गर्मी उतरते आणि सत्ता बदलण्यास देखील वेळ लागत नाही.’ 

‘राजस्थानला विकासाची गरज आहे,  कुटुंबवादाची नाही’

‘काँग्रेसने गेल्या चार वर्षांमध्ये राजस्थानचे खूप नुकसान केले आहे. ही गोष्ट सरकारला पण माहीत आहे की आता काँग्रेसचा पराभव निश्तिच आहे. जेव्हा दिवा विझणार असतो तेव्हा सुरुवातीला तो जोरात फडफडतो असं म्हटलं जातं.’ काँग्रेसला आपल्या पराभवाची भिती आहे म्हणून असं करत असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला आहे.

‘काँग्रेस म्हणजे खोट्याचा बाजार, लुटणारं दुकान, आता राजस्थानला स्थिर सरकार हवं आहे.’ राजस्थानला विकासवाद हवा आहे कुटुंबवाद नाही असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की, ‘राजस्थानमध्ये जेव्हा काँग्रेसचं सरकार आलं तेव्हा त्यांनी त्यांची एक ओळख बनवली ती म्हणजे भ्रष्टाचार. सध्या अशी परिस्थिती आहे की जेव्हा भ्रष्टाचाराची यादी काढली जाते तेव्हा राजस्थान त्यामध्ये आघाडीवर असतं. महिलांच्या राजस्थान हे राज्य बलात्कारात आघाडीवर आहे. परिस्थिती अशी आहे की इथे रक्षकच भक्षक झाले आहेत.’ इथलं सरकार आरोपींना वाचवण्यात व्यस्त असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.  

‘काँग्रेसचे सर्जिकल स्ट्राईकवरही प्रश्न’

‘काँग्रेस हा असा पक्ष आहे की तो सत्तेत राहिला तर देशाला पोकळ करतो आणि सत्तेतून बाहेर पडल्यावर वाईट बोलून देशाची बदनामी करतो. त्यांचे नेते परदेशात जाऊन भारताविषयी वाईट बोलतात. एवढेच नाही तर सैन्याचाही अपमान त्यांनी केला आहे. लष्कराच्या सर्जिकल स्ट्राईकवरही अनेकदा काँग्रेसकडून सवाल उपस्थित केला जात आहे.’ असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. यावर आता काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

हे ही वाचा : 

[ad_2]

Related posts