Window Seat साठी विमानात लोकल ट्रेन स्टाइल तुफान राडा! लाथा, बुक्क्या, शिव्या अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Brawl On Flight Over Window Seat: मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट मिळावी म्हणून लोकल थोडी स्लो झाल्यानंतरच ती पकडणारे अनेकजण आहेत. चालू ट्रेन पकडून धावत जात विंडो सीट पकडणे ही एक कला असल्याचंही अनेक मुंबईकर म्हणतात. लोकल ट्रेनच काय तर एसटी बसमध्येही चांगली हवेशीर विंडो सीट मिळावी म्हणून बस आगारात शिरल्या शिरल्या त्यावर तुटून पडलेली प्रवाशांची झुंबड आपल्यापैकी अनेकांनी प्रत्यक्षात पाहिली असेल. मात्र विंडो सीटवरुन विमानात राडा झाल्याचं सांगितलं तर तुमच्या भुवया नक्कीच उंचावतील. मात्र खरोखरच असा प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर या हाणामारीचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. हाणामारी केलेले दोन्ही प्रवासी एकमेकांना शिवीगाळ करत होते, कानाखाली मारत होते. मध्यस्थी करण्यासाठी अखेर केबिन-क्रूला जोर लावावा लागला. त्यानंतर कुठे हा वाद थोडा शांत झाला.

सहप्रवाशांना आलं नाही यश

विमानात विंडो सीटवरुन लोकल ट्रेन स्टाइला राडा घडल्याचा प्रकार माल्टावरुन लंडनला जाणाऱ्या रेयान एअर एअरलाइन्सच्या विमानात मागील आठवड्यात घडली. स्टॅनस्टेड एअरपोर्टवर विमानत बसलेले 2 प्रवासी आसनव्यवस्थेच्या रचनेवरुन एकमेकांशी वाद घालू लागले. बाचाबाचीवरुन पाहात पाहता हा प्रकार थेट हाणामारीपर्यंत पोहोचला. दोघे एकमेकांना हाताचा आणि लाथांचा प्रसाद देऊ लागले तेव्हा काही सहप्रवाशांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात या सहप्रवाशांना फारसं यश आलं नाही. 

शिव्या, बुक्के आणि लाथा

विंडो सीटवरुन पहिल्यांदा या दोघांमध्ये बाचाबाची झाली. मात्र त्यानंतर जागेवर बसल्यावरही हे दोघे एकमेकांबद्दल अपशब्द वापरत होते. अचानक या दोघांपैकी एकाने दुसऱ्यावर हात उगारला. मग दोघांमध्येही हाणामारी सुरु झाली. दोघे मिळेल त्या पद्धतीने एकमेकांना मारत सुटले. फटके, बुक्के, लाथांनी ते दोघे एकमेकांचा प्रतिकार करत होते. दोघे एकमेकांना मारताना शिव्याही देत होते. या दोघांच्या वादामुळे विमानात एकच गोंधळ उडाला.

नेमकं घडलं काय?

विमानातील एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटीश प्रवाशाने एका अमेरिकन प्रवाशाला त्याच्या विंडो सीट जाण्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्यावरुनच वाद सुरु झाला. त्यानंतर हाणामारीला सुरुवात झाली. या हाणामारीमुळे विमानाचे उड्डाण 2 तास उशीराने झाले. यामुळे विमानातील सर्वच प्रवाशी वैतागले. अनेकजण बसल्या जागेवरुनच ओरडत होते, “वाद घालू नका. तुमच्या वादामुळे कोणालाच घरी जाता येणार नाही.” मात्र इतर प्रवाशांच्या आरडाओरडीचा या दोघांवर काहीच परिणाम होत नव्हता. 

दूर बसवलं

अखेर केबिन-क्रूने मध्यस्थी केली. विमानतळावरील सुरक्षारक्षकांच्या मदतीने या दोघांचा वाद मिटवण्यात आला. त्यांना एकमेकांपासून दूर बसवण्यात आलं. 

Related posts