[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
टॅटू बनवणारे रक्तदान करू शकतात का?
गोंदण किंवा छिद्र पाडण्याच्या प्रक्रियेतून गेलेले लोक रक्तदान करू शकतात परंतु जर त्यांनी नियमांचे योग्य पालन केले तरच ते ही विहित कालावधीनंतर. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एखादी व्यक्ती टॅटू काढल्यानंतर एक वर्षानंतरच रक्तदान करू शकते.
लक्षात ठेवा की टॅटू गोंदविणाऱ्यांसाठी रक्तदान करण्याशी संबंधित नियम वेगवेगळ्या भौगोलिक स्थानांमध्ये भिन्न आहेत. दान केलेल्या रक्ताची नेहमी रक्तजन्य रोग किंवा संसर्गाची शक्यता तपासण्यासाठी त्याची परीक्षण केली जाते.
1 वर्षापूर्वी टॅटू गोंदविलेले रक्तदान का करू शकत नाहीत?
आरोग्यसुविधेच्या नियमानुसार टॅटू काढून एक वर्ष पूर्ण न झालेल्या लोकांना रक्तदान करण्यास मनाई आहे, जेणेकरून टॅटू काढल्यानंतर ती जागा पूर्ववत होण्यास वेळ मिळेल. टॅटू नेहमी कायदेशीर मान्यता असलेल्या ठिकाणाहूनच काढले पाहिजे.
कारण बहुतेकदा ते तुम्हाला आजारी पडण्याचा धोका निर्माण करतात. पार्लरमध्ये वापरण्यात येणारी साधने, सुया इत्यादी निर्जंतुकीकरण न होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचेचे आजार आणि हेपेटायटीस आणि एचआयव्ही सारख्या गंभीर रक्तजन्य आजारांचा धोका वाढतो.
(वाचा – उपाशीपोटी सकाळी चालण्याचे जबरदस्त फायदे, ५ समस्या होतील छूमंतर तर मानसिक आरोग्यही सुधारेल)
कालावधी निश्चित
यामुळेच यामध्ये एक वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आला असून, यामध्ये टॅटू पूर्णपणे बरा होण्यास वेळ मिळतो. कोणतीही प्रतिक्रिया पहिल्या ६ महिन्यांत दिसून येते. त्याचवेळी, आणखी एक गोष्ट जाणून घेणे आवश्यक आहे की आपण दान केलेले रक्त दीर्घकाळ आजारी रूग्णांच्या उपचारांसाठी वापरले जाते आणि ते पूर्णपणे तपासले जाणे आणि संसर्गापासून मुक्त असणे आवश्यक आहे.
(वाचा – पावसाळ्यात मका खाणं ठरू शकतं घातक, त्वचेपासून पोटापर्यंत आरोग्याचा वाजेल बँड)
टॅटूचे आरोग्यावर काय परिणाम हातात?
- त्वचेचा संसर्ग, फोड आणि सूज हे टॅटूचे सर्वात सामान्य दुष्परिणाम आहेत. चांगली काळजी घेतल्यास, बहुतेक टॅटू काही आठवड्यांत बरे होतात. टॅटूभोवती कोरडेपणा आणि खाज सुटणे सामान्य आहे. तथापि, दीर्घकाळापर्यंत सूज आणि वेदनेसह संसर्ग होऊ शकते. जंतुसंसर्गामुळे त्वचेवर पुरळ, डाग, जखमा इत्यादी देखील होऊ शकतात
- गोंदणासाठी वापरल्या जाणार्या साधनांमध्ये आधीच संसर्गजन्य रक्त असेल किंवा वापरण्यात आलेली सुई निर्जंतुक नसेल तर हिपॅटायटीस बी किंवा सी सारखे आजार होण्याची शक्यता असते
- काही प्रकरणांमध्ये, ज्या लोकांना आधीच काही व्याधी किंवा आजार असल्यास त्यांच्यावर टॅटूची विपरीत परिणाम होऊ शकतात.
- याशिवाय संवेदनशील आणि त्वचेची ऍलर्जी असलेल्या लोकांना टॅटूच्या रंगाच्या शाईचा त्रास होऊ शकतो, अशा परिस्थितीत या लोकांनी टॅटू काढणे टाळावे. वरीलपैकी कोणतीही प्रतिक्रिया दीर्घकाळ राहिल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
(वाचा – Fit India च्या सॅम्युअलचा २५ किलो वजन घटविण्याचा इंटरेस्टिंग प्रवास, प्रेरणादायक Weight Loss कहाणी)
[ad_2]