तुमच्या कानाचा आकार सांगतो तुमचा स्वभाव आणि गुण

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ear Shape Personality Test: तुम्ही कधी तुमच्या कानाचा आकार काय आहे हे पाहिलं आहे का? तुमचे कान छोटे आहेत किंवा टोकदार आहेत याकडे तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? याचं कारण आपले कान फक्त ऐकण्याचं काम करत नाहीत. तर त्याच्या आकारात अनक गोष्टी दडलेल्या असतात. कानाचा आकार हा आपल्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये, सामर्थ्य, कमकुवतपणा, स्वभाव, मानसिकता, संवाद शैली, भावनिक प्रवृत्ती आणि बरंच काही सांगत असतात. आता कानाचा कोणता आकार काय सांगतो हे समजून घ्या…

1) मोठे कान

जर कानाचा आकार मोठा असेल, तर ती व्यक्ती फार शांत आणि स्थिर असते. हे लोक फार सहजासहजी अस्वस्थ किंवा तणावग्रस्त होत नाहीत. अगदी कठीण परिस्थितीतही ते शांत राहत, योग्य पद्दतीने वागण्यावर भर देतात. ते नेतृत्व करणारे आणि विश्वासू असतात. ते सहजासहजी घाबरत नाहीत, म्हणूनच ते स्वतःच्या मुद्द्यांवर ठाम असतात. ते आशावादी आणि जीवनाचा आनंद लुटण्यावर भर देतात. भूतकाळाच्या आठवणी काढत बसणं आणि भविष्याबद्दल काळजी करणं त्यांना आवडत नाही. 

त्यांना एकावेळी एकच गोष्ट करण्यास आवडतं. ते गोष्टींशी फार जोडले जात नाही, तसंच मनालाही लावून घेत नाहीत. काही गोष्टी सोडून देणं हा आयुष्याचा भाग आहे याची त्यांना जाणीव असते. त्यामुळे ते गोष्टी मागे सोडून पुढे वाटचाल करताना अडखळत नाहीत. ते खुल्या मनाचे असतात. त्यांना नवीन लोकांना भेटणं आणि नवीन गोष्टी करून पाहणं आवडतं. त्यांना आयुष्य जसं आहेत तसं जगायला आवडतं. 

2) छोटे कान

जर कान छोटे असतील तर ती व्यक्ती फार शांत स्वभावाची आणि स्वत:च्या विचारात गुंतलेली असते. नवीन लोकांना भेटण्यास ते फार उत्सुक नसतात. त्यांना एकटं किंवा मित्रांसह वेळ घालवणं आवडतं. ते शिस्तप्रिय आणि सेल्फ कंट्रोल असतात. ते ध्येय निश्चित करतात आणि त्यावर ठाम राहतात. ते सहजासहजी इतरांना भुलत नाहीत. तसंच बुद्धिमान आणि ज्ञानी असतात. ते छोट्या छोट्या गोष्टीही नीट समजून घेतात. 

जर कानाचा आकार लहान असेल, तर त्यांचं व्यक्तिमत्व स्पष्ट करतं की ते लाजाळू आणि अंतर्मुख असतात. नवीन लोकांशी संपर्क साधण्यासाठी त्यांना वेळ लागतो. ते शिस्तप्रिय आणि आत्म-नियंत्रित असतात. ते ध्येय निश्चिच करतात आणि त्यावर ठाम राहतात. ते सहजासहजी भुलत नाही. ते बुद्धिमान आणि ज्ञानी असतात. तसंच सूक्ष्म तपशीलही समजून घेतात.

3) चिकटलेल्या पाकळ्या

जर कानाच्या पाकळ्या चिकटलेल्या असतील तर ती व्यक्ती फार समजूतदार आणि सहानुभूती वाटणारी असते. हे लोक सहजपणे स्वत:ला इतरांच्या भूमिकेत टाकू शकतात. हे लोक समर्थन आणि दिलासा देण्यात चांगले असतात. तसंच हे लोक विश्वासू असतात. आपल्या प्रियजनांच्या प्रत्येक संकटसमयी आणि चांगल्या वेळी ते हजर असतात. हे लोक दिलेला शब्द पाळतात. तसंच या लोकांशी तुम्ही सहजपणे बोलू शकता आणि मैत्री करु शकता. यांच्याशी सहजपणे संवाद साधू शकता. 

इतरांना सहजपणे ते दिलासा देत मन हलकं करु शकतात. हे लोक फार व्यवहारिक आणि जमिनीशी जोडलेले असतात. हे लोक सहजासहजी भावनांमध्ये वाहत जात नाहीत. तर्क आणि कारणांच्या आधारे हे लोक निर्णय घेण्याकडे कल देतात. एखादा धक्का बसल्यानंतर ते सहजपणे त्यातून बाहेर येतात. नवीन परिस्थितीत ते लगेच जुळवून घेतात. 

4) टोकदार कान

जर एखाद्याच्या कानाचा आकार टोकदार असेल तर ती व्यक्ती अंतर्ज्ञानी आणि ज्ञानी आहे. छोटे तपशीलही ते व्यवस्थित पाहतात. यांना लोकांची आणि परिस्थितीची चांगली जाण असते. तसंच हे लोक सर्जनशील आणि कल्पक असतात. यांच्याकडे जगाकडे पाहण्याचा एक अनोखा दृष्टीकोन असतो. हे लोक स्वतंत्र आणि जिज्ञासू असतात. तसंच स्वत: निवडलेल्या मार्गाने जाण्यास घाबरत नाही. 

हे लोक नेहमी नवीन अनुभव घेण्याचा प्रयत्न करत असतात. हे लोक हुशार आणि महत्त्वाकांक्षी असतात. तसंच यशस्वी होण्यास इच्छुक असतात. हे लोक संवेदनशील आणि भावनिक असतात. सौंदर्य आणि कलेने ते सहज प्रभावित आहात. हे लोक भावना व्यक्त करताना विचार करत नाही.

Related posts