How Is Dietary Fiber And Fruit Beneficial For The Body; आहारातील आणि फळातील फायबर, शरीरासाठी कसे ठरते उपयुक्त

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

आहारातील फायबर म्हणजे काय?

आहारातील फायबर म्हणजे काय?

आहारातील फायबर हा वनस्पतीजन्य आहारातील पचन न होणारा भाग असतो. तो आपल्या पचनमार्गातून जातो. या फायबरचे दोन प्रकार असतात : द्रावणीय आणि अद्रावणीय. पोटात द्रावणीय फायबर पाण्यात विरघळतात आणि जेलसारखा पदार्थ तयार करतात, तर अद्रावणीय पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत आणि वजन वाढवतात.

आहारात महत्त्वाचे का असते?

आहारात महत्त्वाचे का असते?

आहारातील फायबरचे आरोग्याला अनेक फायदे आहेत आणि उत्तम आरोग्य राखण्यासाठी हे फायबर महत्त्वाचे असतात. आहारातील फायबरमुळे आतड्यातून अन्न जाण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेला प्रतिबंध होतो. या फायबरमुळे रक्तामध्ये साखर विरघळण्याचे प्रमाणही कमी असते. त्यामुळे रक्तातील शर्करा नियंत्रणात राहते.

आतड्यात कोलेस्टरॉल धरून ठेवते आणि रक्तप्रवाहात ते शोषू देत नाही. परिणामी कोलेस्टरॉलची पातळी कमी राहण्यास मदत होते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. फायबरयुक्त जिन्नसांमुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि शरीरातील कॅलरींचे प्रमाण राखले जाते. त्यामुले वजन कमी करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींसाठी फायबरयुक्त आहार उत्तम असतो.

( वाचा – दातांचा पिवळसरपणा त्वरीत घालवून मोत्यांसारखे चमकविण्यासाठी वापरा नारळ तेल आणि हळदीचे मिश्रण)

फळे हा फायबरचा उत्तम स्रोत कसा?

फळे हा फायबरचा उत्तम स्रोत कसा?

फळांमध्ये आहारातील फायबर मुबलक प्रमाणात असते आणि आहारातून आपल्याला मुबलक फायबर मिळेल, याची खातरजमा फळांमुळे होते. बहुतेक फळांमध्ये द्रावणीय आणि अद्रावणीय अशी दोन्ही प्रकारची फायबर असतात. त्यांचे प्रमाण वेगवेगळे असते.

उदा. सफरचंदांमध्ये द्रावणीय फायबर भरपूर असते तर बेरी प्रकारातील फळांमध्ये द्रावणीय आणि अद्रावणीय फायबर मुबलक असते. केळ, संत्री, बेरी, आंबे, लिची, जांभूळ, पेरू, अननस, कलिंगड आणि डाळिंबांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते.

(वाचा – युरिक अ‍ॅसिड उच्च असणाऱ्यांनी चहा प्यावा की कॉफी, काय सांगतो अहवाल)

फायबरसाठी फळे कशी खावीत?

फायबरसाठी फळे कशी खावीत?

तुमच्या रोजच्या संतुलित, वैविध्यपूर्ण आहारात तुम्ही अनेक प्रकारे फळे समाविष्ट करू शकता. त्यातला एक सामान्यपणे वापरला जाणारा मार्ग म्हणजे पूर्ण फळ खाणे. दुसरा मार्ग म्हणजे फळांचा रस पिणे. यामुळे तुम्ही अनेक फळांचे एकाच वेळी सेवन करू शकता.

एबीसी ज्यूसमध्ये, चाट मसाला घातलेला जांभळाचा रस, मिक्स्ड फ्रूट ज्यूस इत्यादींमध्ये फळांच्या रसांचे छान मिश्रण असते. मुबलक फायबर असलेल्या अल्पोपहारासाठी तुम्ही हे रस तुमच्या स्मूदी किंवा योगर्टमध्येही घालू शकता.

फळे कधी खावी हे वैयक्तिक आवड-निवड आणि वेळापत्रकावर अवलंबून असते. पण सामान्यतः रिकाम्या पोटी किंवा दोन जेवणांच्या मधल्या वेळात फळे खाल्लेली चांगली असतात. रिकाम्य पोटी फळे खाल्ली तर पोषक घटक अधिक चांगल्या प्रकारे शोषले जातात आणि पचनाच्या समस्या उद्भवत नाहीत.

फ्रूट फायबरचे काही लाभ खालीलप्रमाणे

फ्रूट फायबरचे काही लाभ खालीलप्रमाणे
  • पचनयंत्रणा उत्तम काम करते आणि सामान्य पचनाला मदत करते
  • वजन कमी करून ते प्रमाणात राखण्यात मदत होते
  • हृदयाच्या रक्तवाहिनीशी संबंधित आजार, टाइप २ प्रकारचा मधुमेह, मेटाबॉलिक सिण्ड्रोम होण्याचा धोका कमी होतो
  • रक्तातील शर्करा नियंत्रित करण्यास आणि रक्तातील शर्करेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते

तात्पर्य, आरोग्याच्या हितासाठी डाएटरी फायबर (आहारातील फायबर) महत्त्वाचे असते. फळे रुचकर असतातच, त्याचप्रमाणे फायबरचा उत्तम स्रोत असतात आणि फळांमधून अनेक पोषक घटक शरीराला मिळतात. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा किराणा मालाच्या दुकानात किंवा कॅफेमध्ये जाल तेव्हा तुमची आवडती फळे/फळांचा रस नक्की घ्या

[ad_2]

Related posts