mp crime news brother shot Cousin while keeping status ended relationship for a girl

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Crime News : ‘तबाह कर दी जाएगी वो जिंदगी जो म्हारे रास्ते में तकलीफ देगी…’ असा स्टेट्स ठेवत भावाने आपल्या मावस भावाच्या छातीत गोळी (Brother Shot Cousin) झाली. यात भावाचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला, पण पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला अटक केली. हत्येचं कारण होतं 15 वर्षांची अल्पवयीन मुलगी (Minor Girl). या मुलीवर भाऊ प्रेम करत होता, तर आरोपीचाही या मुलीवर जीव जडला होता. दोनही भाऊ लहानपणापासून एकत्र मोठे झाले, एकमेकांशी कधी भांडलेही नव्हते.  पण त्या दोघांमध्ये एका मुलीची एन्ट्री झाली आणि दोनही भाऊ एकमेकांचे हाडवैरी झाले. हा वाद इतका वाढला की एका भावाने दुसऱ्या भावाचा जीव घेतला. इतकंच नाही तर व्हॉट्सअॅपवर आरोपीने स्टेट्सही (WhatsApp Status) ठेवलं.

मध्यप्रदेशमधल्या दतिया जिल्ह्यातील (Madhya Pradesh Datia Murder Case) ही खळबळजनक घटना आहे. दतिया जिल्ह्यातील पथर्रा नारायण गावात आशिक यादव आणि आशीष यादव हे दोन सख्खे भाऊ गावाजवळच्या मंदाराजवळ गेले होते. त्याचवेळी त्यांचा मावसभाऊ 20 वर्षांचा अभय यादव हा तिथे आला. त्याच्याबरोबर त्याचे वडिल लाखन यादव आणि गावातील दोन जण होते. आशिक यादवला पाहातच अभयने गावठी कट्टा काढला आणि तो आशिक यादवच्या दिशेने धावला. त्याला जमीनवर पाडत आधी त्याला माराहाण केली. त्यानंतर भरदिवसा त्याने आशिकच्या छातीत गोळ्या झाडल्या. हत्या केल्यानंतर अभय, त्याचे वडिल आणि त्यांच्याबरोबर असलेले दोन जण तिथून फरार झाले. आशिकला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता. 

व्हॉट्सअॅपला स्टेट्स ठेवलं
हत्येच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी दोघांना अटक केली. पण मुख्य आरोपी अभय आणि त्याचे वडिल लाखन फरा होते. पोलिसांनी त्यांच्यावर 10 हजार रुपयांचं इनाम घोषित केलं. या दरम्यान अभय सोशल मीडियावर सक्रीय होता. आशिकची हत्या केल्यानंतर त्याने व्हॉट्सअॅपला एक स्टेट्स ठेवलं, यात त्याने लिहिलं होतं, तबाह कर दी जाएगी वो‎ जिंदगी जो म्हारे रास्ते में तकलीफ देगी…। त्यानंतर त्याने दुसरं स्टेट्स ठेवल त्यात त्याने लिहिलं होतं, उम्र बहुत बाकी है‎ अभी… हादसे अभी तमाम होंगे…!  इतकंच नाही तर हातात बंदूक घेतलेला एक फोटोही त्याने शेअर केला. 

पोलिसांनी वेगवेगळी पथकं बनवून आरोपी अभय यादवचा शोध सुरु ठेवला, अखेर हत्येच्या दोन दिवसातच आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं. तर दुसऱ्या दिवशी आरोपीचे वडिल लाखन यांनाही पोलिसांनी अटक केली.  प्रमोद यादव यांना आशिष आणि आशिक ही दोन मुलं आणि एक मुलगी आहे. आशिषचं लग्न झालंय. प्रमोद यादव आणि आरोपी लाखन यादव हे मावस भाऊ असून दोन्ही कुटुंबात चांगले संबंध होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लव्ह ट्रँगलमध्ये ही हत्या झाली. मृत आशिक आणि आरोपी अभय एकाच मुलीवर प्रेम करत होते. मुलगी आशिकवर प्रेम करत होती. ही गोष्ट आरोपी अभयला स्वस्त बसू देत नव्हती. त्या मुलीवर काही दिवसांपूर्वी दोन भावांमध्ये जोरदार हाणामारीही झाली होती. 

ही गोष्ट मृत आशिकच्या कुटुंबापर्यंत पोहोचली, पण दोन भावांमधलं हे भांडण आहे असं समजून कुटुंबाने त्या भांडणाकडे दुर्लक्ष केलं. पण इथं आरोपी अभय आणि त्याचे वडिल लाखण यांनी वेगळाच कट रचला. आशिकला रस्त्यातून दूर करण्यासाठी त्याने एक गावठी कट्टा खरेदी केल. या कटात गावातील दोन गुंडांनाही सहभागी करुन घेतलं. 9 जुलैले मृत आशिक आपल्या भावाबरोबर गावाबाहेर केल्याचं कळताच आरोपी अभय आणि त्याच्या वडिलांनी ही संधी साधली त्याला एकट्याला गाठत त्याच्याव गोळ्या झाडल्या. 

Related posts