[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
अचानक समजले आजाराबाबत
सुरूवातीला त्रास झाल्यानंतर डॅनसनने आपल्या व्यस्त वेळापत्रक आणि जगण्याच्या पद्धतीला जबाबदार ठरवले. हेअरड्रेसर म्हणून काम करणारी डॅनसन प्रचंड कामात व्यग्र होती. मात्र अचानक पोटात असह्य त्रास झाल्यानंतर डॉक्टरकडे गेल्यावर तिला इर्रिटेबल बाऊल सिंड्रोम आजाराबाबत समजले. तिला काहीतरी गंभीर आहे याची जाणीव झाली होती. मात्र नक्की काय हे तिला कळत नव्हतं.
Irritable Bowel Syndrome म्हणजे काय
NIDDK ने दिलेल्या अहवालानुसार, तुमच्या ओटीपोटात वारंवार दुखत असेल आणि तुमच्या आतड्याच्या हालचालींमध्ये होणारे बदल, जे अतिसार, बद्धकोष्ठता किंवा दोन्ही असू शकतात अशा लक्षणांचा समूह हा माणसांसाठी त्रासदायक ठरतो आणि असह्य अशा पोटातून कळा येतात. पोटामध्ये एक मोठा फोड निर्माण होतो. ज्यामध्ये सेप्टिक तयार झाल्यास जीवाला धोकाही होऊ शकतो.
(वाचा – ४० व्या वर्षी पोटाची चरबी वितळविण्यासाठी लावा ७ सवयी, झरझर होईल वजन कमी)
डॅनसनच्या पोटात झाला होता फोड
डॉक्टरांच्या फेऱ्या झाल्यानंतर साधारण १ तास तिने हा त्रास सहन केला आणि त्यानंतर तिची कोलोनोस्कोपी झाली, ज्यामध्ये नक्की काय आजार आहे याबाबत तिला समजले, पण हा आजार नक्की काय आहे हे समजून घेण्याइतकी तिच्यात ताकदच नव्हती. या त्रासातून सुटका व्हावी इतकंच तिला वाटत होतं.
(वाचा – मेनोपॉज म्हणजे काय, रजोनिवृत्तीच्या ३ स्टेप्स कोणत्या प्रत्येक महिलेला माहीत हवेच)
केवळ २४ तासात सर्जरीचा सल्ला
इर्रिटेबल बाऊल सिंड्रोममुळे तिच्या पोटात फोड निर्माण झाला होता, ज्यामध्ये सेप्टिक तयार झाले होते. त्यामुळे तिला डॉक्टरांकडून केवळ २४ तास देण्यात आले होते आणि सर्जरी करण्याचे सांगण्यात आले. या सर्जरीमध्ये १८ इंचाचा भाग डॉक्टरांनी काढला. त्याशिवाय तिला या सर्जरीनंतर इलियोस्टॉमी बॅग देण्यात आली. पण तिच्या आयुष्यासाठी हाच एक पर्याय असल्याचेही सांगण्यात आले.
(वाचा – वजन वाढल्याने त्रस्त असाल तर प्या वासयुक्त पदार्थाचा चहा, उपाशीपोटी प्यायल्याने वजन येईल सर्रकन कमी)
इर्रिटेबल बाऊल सिंड्रोमची लक्षणे
इर्रिटेबल बाऊल सिंड्रोमची लक्षणे नक्की कोणती याबाबतही डॅनसनने आपला अनुभव व्यक्त केला
- सतत टॉयलेटला जाणे, दिवसातून साधारण १५ ते २० वेळा
- टॉयलेटला जावे लागणे
- सतत थकवा येणे
- चिंता करत बसणे
- पोटात असह्य कळा येणे
सर्जरीनंतर घ्यावी लागणारी काळजी
हायफायबर फूड्स आहारात न खाणे. तसंच ग्रीन टी नियमितपणे पिणे, सप्लीमेंट डाएट आहारात घेणे आणि कॅफेनचे सेवन न करणे ही महत्त्वाची काळजी सर्जरीनंतर घ्यावी लागते. डॅनसनने या आजाराबाबत अधिक माहिती देण्यासाठी महाविद्यालयात वर्कशॉपही घ्यायला सुरूवात केली असून ‘क्रॉन्स अँड कोलायटिस सपोर्ट लंकाशायर’ची स्थापना करत या अदृश्य आजाराबाबत अधिक माहिती दिली आहे.
[ad_2]