[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
गोड पेये आणि दारू
केवळ खाण्याच्या पदार्थांमुळेच युरिक अॅसिड शरीरात वाढते असं नाही तर दारू आणि गोड ड्रिंक्स यामुळेही रक्तातील युरिक अॅसिडचा स्तर वाढतो. तसंच हे पदार्थ लठ्ठपणा, डायबिटीस आणि हृदयरोगाचा धोकाही निर्माण करतात. त्यामुळे सहसा या पदार्थांपासून दूर राहणे तुमच्यासाठी हिताचे ठरेल.
तूर अथवा उडदाची डाळ
तूर अथवा उडदाची डाळ खाणेही युरिक अॅसिड असणाऱ्या व्यक्तींसाठी नुकसानदायी ठरू शकते. Sciencedirect ने दिलेल्या अहवालानुसार, तूर आणि उडीद डाळीमध्ये अधिक प्रमाणात प्युरिन असते, जे युरिक अॅसिड वाढवते. तसंच किडनी निकामी करून शरीरात गाऊट निर्माण करण्यासही याचा हातभार लागतो.
(वाचा – तुम्हीही सकाळी उठून पिताय का खूप पाणी? योग्य की अयोग्य काय आहे आयुर्वेदाचा सल्ला)
अळकुडीमुळे वाढते युरिक अॅसिड
अळकुडी अर्थात अरबी हा एक हेल्दी पदार्थ आहे, मात्र अळकुडीचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास किडनी खराब होऊ शकते. यामध्ये प्युरीन आणि कॅल्शियम अधिक प्रमाणात असून युरिक अॅसिडमुळे शरीरात स्टोन निर्माण करू शकते. त्यामुळे उच्च युरिक अॅसिडचा त्रास असणाऱ्यांनी कधीही अरबी खाऊ नये.
(वाचा – महिलेच्या पोटातून आल्या असह्य कळा, डॉक्टरांनी सांगितले केवळ २४ तासच जगशील आणि पुढे झाले असे काही…)
मासे आणि मांस
मासे आणि मांस हे प्रोटीनयुक्त असतात मात्र, ज्यांना युरिक अॅसिडची समस्या आहे, त्यांनी या पदार्थांचा आहारात समावेश करून घेऊ नये. शरीरातील युरिक अॅसिडचा स्तर वाढविण्यास हे पदार्थ कारणीभूत ठरतात आणि किडन्यांवर याचा दबाव पडतो. तसंच किडनी निकामी होण्यास याचा हातभार लागतो कारण सी – फूड्स शरीरात अधिक प्युरिन निर्माण करतात.
(वाचा – ४० व्या वर्षी पोटाची चरबी वितळविण्यासाठी लावा ७ सवयी, झरझर होईल वजन कमी)
ठराविक भाजी
फ्लॉवर, शतावरी, पालक, मटार आणि मशरूम या भाज्यांचा तुम्ही आहारात समावेश करू नये. या भाज्यांमध्ये युरिक अॅसिडचा स्तर शरीरात वाढविण्याची अधिक क्षमता असते आणि त्याचा डायरेक्ट किडनीवर परिणाम होतो. त्यामुळे सहसा ही भाजी आहारात समाविष्ट करून न घेणे योग्य ठरेल.
कार्बोहायड्रेट रिच फूड
ब्रेड, कुकीज आणि केक असे प्रोसेस्ड फूड आणि ज्यामध्ये अधिक कार्बोहायड्रेटचा समावेश आहे असे पदार्थ खाणे टाळा. शरीरामधील युरिक अॅसिडचा स्तर वाढवून अधिक त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे उच्च युरिक अॅसिडची समस्या असणाऱ्या रूग्णांनी या पदार्थांपासून दूर राहणेच योग्य ठरेल.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा
[ad_2]