Weekly Money Horoscope : ‘या’ लोकांना होणार मोठा आर्थिक लाभ, पाहा तुमचे भविष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Weekly Money Horoscope 24 to 30 July 2023 : बघता बघता जुलै महिना संपत आला. जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा करिअर आणि आर्थिकदृष्ट्या आपल्यासाठी कसा असेल हे जाणून घेऊयात. (Weekly Career Horoscope 24 to 30 July 2023)

 

मेष (Aries)

या राशीच्य लोकांसाठी कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. पाटर्नशीपमध्ये केलेल्या कामात फायदा मिळणार आहे. मन एखाद्या गोष्टीमुळे  दुःखी होऊ शकतं. आर्थिक बाबतीत बोलायचं झालं तर हळूहळू प्रगती होणार आहे. प्रवासचे योग प्रगती घेऊन आले आहेत. 

शुभ दिवस: 27

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांसाठी कामाच्या ठिकाणीन प्रगतीचे नवीन मार्ग निर्माण होणार आहे. या आठवड्यात तुम्ही नवीन गोष्टी शिकणार आहात. वैवाहिक जीवनात आनंद असणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा खर्चिक ठरणार आहे. या आठवड्यात कुटुंबातून आनंदाची बातमी मिळेल. बाहेर गावी जाण्याचे बेत असल्यास ते पुढे ढकला. 
 
शुभ दिवस: 26, 28

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांसाठी आर्थिक स्थिती मजूबत करणारा हा आठवडा ठरणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला गुंतवणुकीबाबत थोडे चिंतेत असला पण खरे त्यातून तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रगतीचे योग आहेत. या आठवड्यात मात्र आरोग्याकडे लक्ष द्या. 

शुभ दिवस: 24, 28

कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा करिअरच्या दृष्टीकोनातून प्रगतीची असणार आहे. नवीन प्रकल्पातून तुम्हाला दीर्घकाळ लाभ होणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सकारात्मक असेल आणि दीर्घकाळ पैसा तुमच्याकडे येणार आहे. कुटुंबात सुख समृद्धीचे सुंदर क्षण असणार आहेत. प्रवासातून यशाचे मार्ग मोकळे होणार आहेत. 

शुभ दिवस: 27

सिंह (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या वरदान ठरणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे. प्रकल्पातून आनंदाची बातमी मिळणार आहे. कुटुंबात आनंदी वातावरण असणार आहे. बाहेर जाण्याचा बेत असल्यास तो पुढे ढकला. 
 
शुभ दिवस: 26, 27

कन्या (Virgo)

हा आठवडा कन्या राशीच्या लोकांसाठी प्रगती घेऊन आला आहे. एका स्त्रीच्या मदतीने तुम्ही प्रकल्प वेळेत पूर्ण करणार आहात. मुलांसोबत आनंदी क्षण घालविणार आहात. आर्थिकबाबात हा आठवडा जरा कठीण असेल. या आठवड्यात प्रवास टाळणे तुमच्यासाठी योग्य होईल. 

शुभ दिवस: 25, 28

तूळ (Libra)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगले परिणाम घेऊन आला आहे. कुटुंबात आनंद आणि समृद्धी दोन्ही नांदणार आहेत. प्रवासातून यश प्राप्त होईल. आठवड्याच्या शेवटी मालमत्ता किंवा पाटर्नरशीपवरुन तणाव असेल. 

शुभ दिवस: 26, 27

वृश्चिक (Scorpio)

हा राशींसाठी हा आठवडा शुभदायक असणार आहे. कार्यक्षेत्रात सहज यश तुम्हाला प्राप्त होणार आहे. आर्थिक व्यवहारात लक्ष द्या तरच यश प्राप्त होईल होईल. कुटुंबात भविष्याचे सुंदर नियोजन तुम्ही करणार आहात. प्रवासातून आनंदाची बातमी मिळणार आहे. 

शुभ दिवस: 25, 27

धनु (Sagittarius)

हा आठवडा धनु राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण होईल तर रखडलेली कामंही मार्गी लागतील. त्यामुळे या आठवड्यात यशाचे मार्ग खुले होणार आहे. लव्ह लाइफबद्दल मनं प्रसन्न करणारी बातमी मिळणार आहे. आर्थिक बाबतीत विचारपूर्व निर्णय तुमच्या फायद्याचे ठरणार आहे. प्रवासातून शुभ वार्ता मिळणार आहे. 

शुभ दिवस: 25, 27

मकर (Capricorn)

हा आठवडा मकर राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या यशाचा असणार आहे. वडीलधाऱ्या व्यक्तींकडून तुम्हाला लाभ होणार आहे. संपत्तीमध्ये या आठवड्यात वृद्धी होणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगतीचे उंच शिखर तुम्हाला गवसणार आहे. प्रवास मात्र या आठवड्यात टाळलेलाच बरा. 

शुभ दिवस: 25, 26, 28

कुंभ (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप छान असणार आहे. आरोग्याबाबतीत तुम्ही जागृत व्हाल आणि फिटनेसच्या दृष्टीकोनातून नवीन गोष्टी सुरु कराल. कामाच्या ठिकाणाही यश प्राप्त करणार आहात. मात्र हा आठवडा खर्चिक असणार आहे. अनावश्यक प्रवास टाळा. आठवड्याच्या शेवटी सुख समृद्धीचा योग असणार आहे. 

शुभ दिवस:  26, 28

मीन (Pisces)

या राशीच्या लोकांसाठी कामाच्या ठिकाणी प्रगती घेऊन येणार आहे. तुमचे प्रकल्प वेळेत पूर्ण होणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा धनलाभ होणार आहे. गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. प्रवासातून शुभ परिणाम दिसून येणार आहे. भावनिकदृष्ट्या हा आठवडा अस्वस्थ असणार आहे. वडीलधारी मंडळीकडून मदत होणार आहे. 

शुभ दिवस: 25, 27

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts