( प्रगत भारत । pragatbharat.com)
Twitter New Logo ‘X’ : एलन मस्कने (Elon Musk) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर (Twitter) खरेदी केल्यानंतर आत्तापासून ट्विटरमध्ये अनेक बदल करण्यात आले आहे. अलीकडेच एलन मस्कने ट्विटरच्या नवीन सीईओ म्हणून लिंडा याकारिनो ( Linda Yaccarino) यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर एलन मस्कने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्विटरचा लोगो (Twitter Logo) आणि नाव बदलण्यात (Twitter Rename) येणार आहे. लवकरच या नवीन बदलासह ट्विटर युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. (Twitter Logo Changed)
ट्विटरचा निळा रंग आणि त्याच्या लोगोवर असलेले चिमणी ही खास ओळख होती. मात्र आता तिच ओळख बदलण्यात येणार आहे. आता ट्विटर X नावाने ओळखले जाणार आहे. तसा बदल ट्विटरच्या अधिकृत ट्विटर हँडलवर करण्यात आला आहे. ट्विटरच्या अकाउंटवरील लोगो बदलण्यात आला आहे. त्याचबरोबर नावही X करण्यात आलं आहे. ट्विटरच्या नवीन सीईओ लिंडा याकारिनो यांनीही ट्वीटकरत X नावाबाबत माहिती दिली आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेला एलन मस्कने ट्विटर खरेदी केल्यानंतर कंपनीत आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक बदल केले. मात्र, नाव आणि लोगो बदलण्याचा निर्णय आत्तापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय होता. ट्विटरच्या नव्या सीईओ लिंडा याकारिनो यांनी ट्विट करत म्हटले आहे की, लाइक, कॅमेरा आणि एक्स… त्याचबरोबर एका इमारतीवर X लोगोला लाइटिंग केल्याचे दिसत आहे.
एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्यापूर्णी भारतीय वंशाच्या पराग अग्रवाल यांच्याकडे ट्विटरचा पूर्ण कारभार होता. मात्र मस्कची एन्ट्री होताच त्यांनी राजीनामा दिला. तसंच, अनेकांना ट्विटरने कामावरुनही काढले होते. त्यानंतर मस्कने अनेक नवीन व्यक्तींना रुजू करुन घेतले. ट्विटरच्या नवीन सीईओ लिंडा यांनी अलीकडेच कारभार हाती घेतला आहे. लिंडा ट्विटरच्या सीईओ म्हणून बिझनेस ऑपरेशनवर काम करणार आहेत.
— Elon Musk (@elonmusk) July 23, 2023
लिंडा यानी सीईओपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर एलन मस्क यांनी त्यांचे अभिनंदन आणि वेलकम करतानाच ट्विटरमध्ये बदल होणार असल्याचे संकेत दिले होते. लिंडा यांचे स्वागत करताना त्यांनी म्हटलं होतं की, या प्लॅटफॉर्मला एक्स, द एवरीथिंग अॅपमध्ये बदलण्यासाठी मी लिंडासोबत काम करण्यास उत्सुक आहे.