Minor girl was gang raped by being taken to a hill wood was thrown in her private part;हैवानीची हद्द पार! टेकडीवर नेऊन अल्पवयीन मुलीचे सामूहिक बलात्कार, नंतर प्रायव्हेट पार्टमध्ये टाकले लाकूड

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Minor Girl was Gang Raped: मध्य प्रदेशातील (मध्य प्रदेश) सतना जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे काही वासनांधांनी एका अल्पवयीन मुलीला टेकडीवर नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांच्यातील हैवान अजूनही जागा होता. बलात्कारानंतर त्यांनी तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लाकूड टाकले. जिल्हा मुख्यालयापासून ६० किमी दूर असलेल्या गावात ही घटना घडली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली अल्पवयीन मुलगी घरी पोहोचली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबाच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने घटलेला प्रकार सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी तिला थेट पोलिस ठाण्यात नेले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडितेच्या जबानीवरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे दोघेही शारदा व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत.

पीडितेला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अल्पवयीन मुलीच्या जबानीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक आशुतोष गुप्ता यांनी सांगितले.

शिवराज सिंह चौहान यांचे ट्विट 

शिवराजचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करुन या मुलीप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या. मैहरच्या मुलीवर बलात्कार झाल्याची माहिती मिळाली आहे. मन दुःखाने भरले आहे. मी व्यथित झालो आहे. कोणत्याही गुन्हेगाराला सोडू नये, अशी सूचना पोलिसांना केली आहे. तर मुलीवर योग्य उपचार व्हावेत, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

लज्जास्पद घटना 

राज्यात दिवसेंदिवस लज्जास्पद घटना समोर येत आहेत. निरपराधांवर अत्याचार, महिलांवरील अत्याचार, आदिवासी अनुसूचित जमातींवरील अत्याचार अशा घटना आज राज्याची प्रतिमा बनली आहेत. येथे कायदा आणि सुव्यवस्था नाही, असे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ म्हणाले. तसेच पीडितेवर चांगले उपचार आणि एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

बायकोला 4 वर्षे दिली हार्मोनल इंजेक्शन्स

अनैतिक संबंधांचे प्रकार वाढताना दिसत आहेत. हे संबंधांमध्ये कोणता अडथळा येऊ नव्हे म्हणून लोकं टोकाची पाऊले उचलताना दिसतात. यातुनच अनेक भयंकर गुन्हाचे प्रकार समोर आले आहेत. या सर्व गुन्हे छोटे वाटतील असा भयानकर प्रकार एका नवऱ्याने आपल्या पत्नीसोबत केला आहे. या पतीने आपल्या पत्नीला सतत 4 वर्षे हार्मोनलची इंजेक्शन दिली. यामुळे त्याची 25 वर्षांची बायको आता 90 वर्षांची दिसू लागली आहे. असे करण्यामागचे कारण ऐकून तर तुम्हाला धक्काच बसेल.

बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील एका व्यक्तीचे आपल्या वहिनीसोबतच अनैतिक संबंध होते. त्याला हे संबंध असेच कायम ठेवायचे होते. पण त्याची पत्नी यामध्ये येतेय असे त्याला वाटत होते. वहिनीशी अनैतिक संबंध सुरू ठेवण्यासाठी त्याने तब्बल 4 वर्षे आपल्या बायकोला हार्मोनल इंजेक्शन दिले. सतत हार्मोनल इंजेक्शन्समुळे 25 वर्षीय महिलेचे शरीर तिच्या वर्षांहून अधिक वाढले आणि तिच्या चेहऱ्यावर केसदेखील आले आहेत. यामुळे तिचा चेहरा अगदीच विद्रुप दिसू लागला आहे.

Related posts