PUBG Addicted boy cut the veins and fingers with the blade;PUBG खेळाचं लागल व्यसन! मुलाने ब्लेडने नस आणि बोटे कापली

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PUBG: मोबाईलवर सतत गेम खेळणाऱ्या मुलांना वेळीच रोखले नाही तर त्यांची आवड कधी व्यसनात बदलेल हे सांगता येत नाही. मैदानात खेळण्याच्या वयात एकदा मोबाईल गेम खेळण्याचे व्यसन जडले तर त्याचे परिणाम निश्चितच वाईट होतात. अशीच एका घटना नुकतीच घडली असून यामध्ये मुलाने स्वत:ची नस आणि बोटे कापली आहेत. पब्जी खेळाच्या नादात मुलाने स्वत:च्या शरीराची अशी वाट लावून घेतली. आता त्याच्या आईवडिलांकडे पस्तावण्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही.

सुरक्षेच्या कारणास्तवर पब्जी गेम आपल्या देशात बंद करण्यात आला आहे. पण अजून वेगळे अॅप्लिकेशन वापरुन हा गेम खेळला जातो. या खेळामुळे मुलांच्या शारीरिक-मानसिक विकासावर वाईट परिणाम होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता पब्जी गेम खेळताना एका मुलाने हाताची नसा आणि हाताची तीन बोटे कापली. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील बरेली येथे घडले आहे. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या मुलाला पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यानंतर नातेवाइकांनी तात्काळ मुलाला रुग्णालयात नेले, तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

बरेलीच्या भामोरा येथे राहणारा अर्जुन हा पाचवीचा विद्यार्थी आहे. त्याचे अर्जुनला PUBG गेमची इतकी आवड होती. त्याची आवड हळुहळू व्यसनामध्ये कधी बदलली हे त्याला आणि त्याच्या पालकांना कळाले नाही. सुरुवातीला तो एखादे नातेवाईक घरी यायचे तेव्हा त्यांच्याकडून मोबाइल घ्यायचा आणि त्याच्या खोलीत जायचा. त्याला खेळ खेळण्याची इतकी आवड असायची की तो भान हरपून खेळायचा. 

मुलाला रुग्णालयात दाखल

नातेवाईकांनी जखमी मुलाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. त्याच्या शरिरातून खूप रक्त वाहून गेले होते. म्हणून संबंधित रुग्णालयाने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.  मुलाला जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मात्र, या प्रकरणी नातेवाईकांनी पोलिसात कोणतीही तक्रार केलेली नाही. 

आता मुलाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्याच्या जखमेवर मलम लावण्यात आले आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला घरी पाठवण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

या प्रकरणातील मुलाने पब्जीच्या नादापाई स्वत:ला ईजा करुन घेतली. पण याआधी पब्जी घेळण्यास रोखले म्हणून आईला गोळ्या घातल्याची घटना देखील समोर आली आहे. तसेच दुसऱ्या एका घटनेत पब्जीच्या व्यवसनामुळे आपल्या चुलत भावाचा गळा दाबून खून केल्याचे समोर आले होते. 

Related posts