( प्रगत भारत । pragatbharat.com)
Woman Quits Job 3 Days After Joining: बेरोजगारीची समस्या केवळ भारतात नसून जगभरामध्ये आहे. त्यामुळे हल्लीच्या काळात नोकरी मिळणं फार कठीण समजलं जातं. मात्र असं असतानाही नोकरी मिळाल्यानंतर एखाद्याने अवघ्या 3 दिवसांमध्ये नोकरी सोडावी लागली, असं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल. असं करण्यामागे नेमकं काय करण असेल असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. खरं तर अनेकजण जास्त पॅकेज आणि संधीच्या नादात अनेक नोकऱ्या बदलतात. मात्र असेही काही असतात ते बॉसमुळे वाटणारा मानसिक तणाव आणि कामाच्या त्रासाला कंटाळून नोकरी सोडतात. असाच एक प्रकार नुकताच समोर आला आहे. इंटरनेटवर या राजीनाम्याची चांगलीच चर्चा आहे. या प्रकरणामध्ये एका महिलेने नोकरी लागल्यानंतर अवघ्या 3 दिवसात नोकरी सोडली. तिने असं का केलं यामागील कारणाचा सविस्तर खुलासा करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मी काही चुकीचं तर केलं नाही ना?
रेडिट नावाच्या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर यासंदर्भातील एक पोस्ट या महिलेनं केली आहे. यामध्ये तिने बॉसला कंटाळून आपण नोकरी सोडल्याचं म्हटलं आहे. मी जॉइन झाल्यापासून माझा बॉस माझ्याशी अशा गोष्टींबद्दल बोलायची की ज्याला मला वीट आला होता. त्यालाच कंटाळून मी नोकरी सोडली. मी काही चुकीचं तर केलं नाही ना? असा प्रश्नही या महिलेने तिच्या पोस्टमध्ये विचारला आहे. मागील सोमवारीच मी कंपनीमध्ये रुजू झाले होते. त्यानंतर एका दिवसाने म्हणजेच बुधवारी माझ्या बॉसने मला जॉब सोडण्यास सांगितलं.
टॉयलेटला गेल्यावरुनही टोमणे
या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या बॉसने तिसऱ्या दिवशी तिला नोकरी सोडण्यास सांगण्याच्याआधीच तिने राजीनामा दिला होता. एवढ्या तडकाफडकी नोकरी का सोडली याचं स्पष्टीकरण तिने दिलं आहे. माझा बॉस मला ओरडायचा आणि म्हणायचा की आधीच तू काम करत नाही वरुन टॉयलेटल्या गेल्यानंतर 10 मिनिटांपेक्षा अधिक वेळ लावतेस, असा दावा या महिलेने पोस्टमध्ये केला आहे. तुला मानसिक आजार आहे का असा प्रश्नही या महिलेच्या बॉसने तिला विचरला. मला केवळ 3 दिवस ओळखणाऱ्या व्यक्तीने असा प्रश्न विचारल्याने फार वाईट वाटलं, असं या महिलेने रेडिटवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. कोणताही बॉस त्याच्या नव्या कर्मचाऱ्याशी अशापद्धतीने बोलत नाही असंही या महिलेने पोस्टमध्ये नाराजी जाहीर करताना म्हटलं आहे.
जागेवरच दिला राजीनामा
मी काही कामच करत नाही असं माझ्या बॉसचं म्हणणं आहे. पण मला काही कामच दिलं जात नाही, असं महिलेने पोस्टमध्ये म्हटलं आहे. मला माझा बॉस काम देत नाही. मला माझा एक वरिष्ठ सहकारी काम असाइन करतो. त्यांनी दिलेलं काम मी पूर्ण करते. तसेच आपल्याला अॅसिटीचा त्रास असल्याने अनेकदा टॉयलेटला जावं लागायचं असं स्पष्टीकरणही या महिलेने 10 मिनिटं टॉयलेटला जाते म्हणत केलेल्या आरोपांवरुन दिलं. मात्र हे सारं समजून घेण्याचा प्रयत्न बॉसने केला नाही. हे समजावण्याचा प्रयत्न केला असता बॉस आपल्यावर ओरडला आणि माझ्याशी वाद घालू नको, असं म्हटल्याचा आरोप या महिलेने केला आहे. तू काम करण्यास लायक नाही असं या बॉसने महिलेला म्हटल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच तू काम करण्याची ओव्हरअॅक्टींग तर करत नाहीस ना असंही बॉसने या महिलेचा पाणउतारा करत म्हटलं. हे सारं ऐकून त्या महिलेने जागेवरच अवघ्या तिसऱ्याच दिवशी बॉसला मी आताच्या आता इथेच राजीनामा देत आहे, असं म्हटल्याचं पोस्टमध्ये सांगितलं आहे.
‘मी 3 दिवसात नोकरी सोडली’ नावाने शेअर केलेल्या या पोस्टला रेडिटवर 16 हजार लाइक्स आले असून एकूण 2 हजारांहून अधिक जणांनी कमेंट केली आहे.