‘लडकी चाहीये?’ गोव्यात दलालांचा सुळसुळाट, भर रस्त्यातच प्रश्न विचारतात आणि…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Goa News : गोवा… फक्त नाव घेतलं तरीही त्यातला निवांतपणा आपोआपच भासतो. अशा या गोव्यात गेल्या काही दशकांपासून पर्यटकांचा ओघ सातत्यानं वाढतोय. सहसा डिसेंबर महिन्यात गर्दी होणाऱ्या याच गोव्यात आता वर्षभर पर्यटकांची रिघ लागलेली असते. इथल्या समुद्रकिनाऱ्यांवर निवांत बसणाऱ्यांपासून, समुद्रात डुंबणाऱ्या, उसळत्या लाटांशी खेळणाऱ्या आणि गोव्यातील खाद्यपदार्थांवर ताव मारणाऱ्यांचाही आकडा मोठा. किंबहुना गोव्याला लाभलेली संपन्न संस्कृती आणि तिथं असणारा पुरातन मंदिरांचा वारसा पाहण्यासाठी येणारा एक वर्गही या ठिकाणाच्या प्रेमात. पण, याच गोव्याचा चेहरामोहरा आता मात्र पालटताना दिसतोय. 

गोव्यात पर्यटकांना ‘ऑफर’

गोव्यात पर्यटकांच्या अनुषंगानं अनेक आकर्षक गोष्टींची आखणी केल्याचं पाहायला मिळतं. येथील हॉटेलांमध्येही पर्यटकांच्या सोयीसाठी, त्यांना आवडेच अशीच व्यवस्था पाहायला मिळते. याच गोव्यात आता म्हणे काही चुकीचे प्रकार फोफावताना दिसत आहेत. गोव्यात मद्याचा सर्रास वापर पाहता, इथं येणाऱ्या अनेकांच्यात हातात दिसणारे मद्याचे प्याले आता सर्वसामान्य आहेत. किंबहुना यामध्ये स्थानिकांहून जास्त संख्या ही पर्यटकांचीच आहे. यातच काही ठीकाणांवर अमली पदार्थांची चुकीच्या मार्गानं होणारी विक्रीसुद्धा आता नवी राहिलेली नाही. पण, यातच आता गोव्यात पर्यटकांना समोरूनच ‘लडकी चाहिये क्या?’ असं विचारणाऱ्या दलालांचाही सुळसुळाट पाहायला मिळत आहे. त्यामुळं गोव्यात असा प्रश्न विचारला असता तातडीनं त्या व्यक्तीची तक्रार पोलिसांत करण्यातं आवाहन केलं जात आहे. 

हल्लीच गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे आमदार विनेश बोरकर यांनीही आपल्यासोबत घडलेल्या प्रसंगाचा अनुभव जाहीरपणे सांगितला आणि अनेकांच्याच भुवया उंचावल्या. रस्त्यावरून जात असतानाच गोव्यात बोरकर यांचं वाहन थांबवून ‘सर, लडकी चाहिये क्या?’ असा प्रश्न दलालानं गेला आणि त्यांनाही धक्काच बसला. हेच दलाल गोव्याची प्रतिमा मलिन करत असल्याचं म्हणत पोलीस त्यांच्याविरोधात कारवाई का करत नाहीयेत? असा सवाल त्यांनी भर सभागृहातच विचारला होता. 

 

गोव्यात असणाऱ्या या दलालांनी आता पर्यटकांसोबतच स्थानिकांच्या वाहनांना थांबवूनही त्यांच्यापुढं ही ऑफर ठेवण्यास सुरुवात केली आहे. ही सर्व परिस्थिती पाहता शेकड्यानं सुरु असणाऱ्या एस्कॉर्ट सर्विस पुरवणाच्या संकेतस्थळांवर कठोर कारवाई करण्याची मागणी बोरकर यांनी केली. 

परदेशी पर्यटक आणि गुन्हेगारी

उपलब्ध माहिती आणि एका प्रसिद्ध वृत्तपत्रात नमूद करण्यात आलेल्या संदर्भांनुसार गोव्यात येणाऱ्या परदेशी नागरिकांकडूनही या राज्याची प्रतिमा मलिन होत आहे. 2020 ते जून 2023 दरम्यान इथं साधारण दोनशेहून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली. पोलिसांमध्ये नोंद असणाऱ्या या गुन्ह्यांमध्ये परदेशी नागरिकच संशयित आरोपी असून, इथं असणारे अनेक परदेशी पर्यटक मायदजेशी माघारी न जाता गोव्यात बेकायदेशीर पद्धतीनं वास्तव्यास असतात, त्यामुळं हीसुद्धा गोव्यासाठी एक चिंतेची बाब ठरत आहे. 

Related posts