Shani : शनिदेवा ‘या’ राशींच्या लोकांना कधीच देत नाही त्रास, रंकाचाही बनतो राजा

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Saturn Favorite Zodiac Sign :

शनिदेवाचं नाव घेतलं तरी आपल्याला घाम फुटतो. शनिदेव हा माणसाला त्याचा कर्माची फळं देतो. सध्या शनी स्वगृही म्हणजे कुंभ राशीत विराजमान आहे. शनी हा ग्रह सर्वात संथ गतीने आपलं स्थान बदलतो. तब्बल अडीच वर्षांनी शनिदेव कुंभ राशीतून निघून दुसऱ्या राशीत प्रवेश करेल. यानुसार तब्बल 30 वर्षांनी शनि पुन्हा कुंभ राशीत येणार आहे. त्यामुळे जेव्हा शनि आपलं स्थान बदलतो तेव्हा 12 ही राशींवर त्याचा परिणाम दिसून येतो. (shani dev Saturn Favorite Zodiac Sign these zodiac signs suffer makes them kings)

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हा पापग्रह काही राशींवर कधी नाराज होतं नाही. एवढंच नाही तर शनिदेवामुळे रंकाचाही राजा बनतो. शनिदेवाच्या प्रिय रास कुठल्या त्यात तुमची रास आहे का जाणून घ्या. 

‘या’ राशींवर शनिदेवाची विशेष कृपा 

वृषभ (Taurus) 

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असून ही चंद्राची उच्च रास आहे. त्यामुळे अशा स्थितीत शनि आणि शुक्र हे मित्र आहेत. त्यामुळे ही शनिदेवाची आवडी रास आहे. शनिदेव या राशीवर प्रसन्न राहतो आणि साडेसाती, अडीचकी आणि महादशेतही चांगली फळं जाचकाला देतो. 

कर्क (Cancer)

 कर्क राशीचा स्वामी चंद्र त्यामुळे या राशीवर शनिदेव आपली वक्रदृष्टी टाकत नाही.जाचकाच्या कुंडलीत शनि साडेसाती किंवा महादशा सुरु असेल तर थोडा त्रास होतो पण फार फरक पडतं नाही. 

तूळ (Libra)

तूळ राशीचा स्वामी पण शुक्र त्यामुळे या राशीवरही शनिदेव प्रसन्न असतात. यांच्या कुंडलीत शनि साडेसातीचा प्रभाव पडत नाही. 

कन्या (Virgo)

कन्या राशीचा स्वामी बुध असून या राशीचे तीन घरांचे स्वामी बुध, शनि आणि शुक्र आहे. अशा स्थितीत शनि किंवा चंद्र त्रिकोण भावात असतो. त्यामुळे शनिचा या राशीवर परिणाम होत नाही. 

मीन (Pisces)

मीन राशीचा स्वामी गुरु आहे. जेव्हा शनि आणि गुरु यांची युती होते ते जाचकांला अतिशय चांगले फळं देते. विशेष म्हणजे साडेसातीतही शनिदेव प्रसन्न असतो. 

मकर (Capricorn)

मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे. त्यामुळे शनिदेवाचे मकर राशीच्या लोकांना वरदहस्त असतो. या लोकांना शनिदेव धन, वैभव, यश सगळं देतो. 

कुंभ (Aquarius)

शनिदेव कुंभ राशीचा स्वामी आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही. कुंभ राशीचे लोक खूप भाग्यवान असतात.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts