( प्रगत भारत । pragatbharat.com)
Margi Shani : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव हा कर्माचा कारक म्हणजे न्यायाची देवता म्हणून ओळखला जातो. शनिदेव हा लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो असं म्हणतात. म्हणून लोकांना शनिदेवाची भीती वाटते. शनिदेव ज्या लोकांना वक्रदृष्टी ठेवता तो श्रीमंत असेल तर त्याला द्रारिद्य येतं. पण ज्याचे कर्म चांगले असतील शनिदेव चांगली फळंही देतो. शनी देव लवकरच मार्गी चालणार आहे. त्याचा प्रभाव 12 राशींवर होणार आहे. सध्या शनि त्याच्या स्वगृही कुंभ राशीत विराजमान आहे. 17 जूननंतर 140 दिवसांनंतर मागे फिरणार आहे. येत्या 4 नोव्हेंबर 2023 ला मार्गी होणार आहे.
ज्योतिष तज्ज्ञ असं म्हणतात की, शनिदेवाची मार्गी स्थिती ही शुभफल देणार आहे. शनिदेव 4 नोव्हेंबरला सरळ मार्गस्थ होणार असून याचा परिणाम सर्व राशींवर सकारात्क तर काही राशींवर नकारात्मक दिसणार आहे. शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ मिळणार आहे. शनि मार्गीचा खास करुन तीन राशींच्या लोकांवर धनवर्षाव होणार आहे. संपत्तीसोबत प्रगती घेऊन येणार आहे.
मिथुन (Gemini)
या राशीच्या लोकांचं भाग्य उजळून निघणार आहे. कारण कुंभ रास ही मिथुन राशीच्या भाग्यस्थानात येते आणि शनी त्या दिशेने फिरणार आहे. त्यामुळे या लोकांच्या नशिबात वाढ होणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होणार आहे. अकडलेला पैसा तुम्हाला परत मिळणार आहे. स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थींसाठी हा काळ उत्तम असणार आहे. ही लोक परदेशात शिक्षणासाठी जाऊ शकतात.
तूळ (Libra)
या राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा शनी मार्गी झाल्यामुळे पूर्ण होणार आहे. तुळा राशीच्या पाचव्या घरात कुंभ रास येते. अशा स्थितीत मुलाकडून आनंद किंवा चांगली बातमी मिळणार आहे. अगदी हे लोक नवीन मालमत्ता खरेदी करणार आहेत. नोकरीत प्रमोशन मिळणार आहे. भौतिक सुखात वाढणार आहे. आध्यात्मिक गोष्टीत तुमची गोडी वाढणार आहे.
मकर (Capricorn)
या राशीच्या लोकांनाही शनिदेव मार्गी लागल्याने फलदायी ठरणार आहे. मकर राशीच्या लोकांवर शनि सतीचा प्रभाव आहे. तरीदेखील प्रतिगामी शनीच्या ग्रहामुळे त्यांना आतापर्यंत जो त्रास होत आहे तो शनि देव मार्गी लागल्याने कमी होणार आहे. मकर राशीच्या लोकांना शनिदेवाच्या कृपेने अचानक पैसा मिळणार आहे. दीर्घकाळ अडकलेले पैसे तुम्हाला मिळणार आहे.