फॉलोअर्स वाढवण्यासाठी केला लैंगिक छळ झाल्याचा खोटा आरोप; सत्य समोर आलं अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Viral News : सोशल मीडिया हे मनोरंजनासोबत कमाईचं एक साधन बनवलं आहे. काही कष्ट न करता त्यावर व्हिडीओ आणि रील बनवून तुम्ही फॉलोअर्स जोरावर कमाई केली जाते. अनेक तरुणांसोबत या सोशल मीडियाने वेड लावलं आहे. अगदी जीव धोक्यात घालून प्रसिद्धी साठी व्हिडीओ तयार केले जातं आहे. यूजर्स नको त्या गोष्टी करुन फॉलोअर्सची संख्या वाढविण्यासाठी आणि प्रसिद्धाच्या ओघात चुकीची पाऊले उचलतं आहेत. याच सोशल मीडियावर फॉलोवरची संख्या वाढविण्यासाठी तरुणीने धक्कादायक कृत्य केलं आहे. 

चीनमधील एका 24 वर्षीय Influencer ला तिचं हे कृत्य महागात पडलं आहे. या तरुणीने सोशल मीडियावर तिच्या अकाऊंटवर एक धक्कादायक व्हिडीओ शेअर केला. त्याात तिने सांगितलं की, रेस्टारंटमध्ये ती असताना एका अनोळखी व्यक्तीने मद्यपान करुन तिता लैंगिक छळ केला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेतली. 

शेन असं या तरुणीचं नाव असून 28 जुलैला एका सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, ती आणि तिचा एक मित्र दक्षिण चीनमधील हुनान प्रांतातील चांगशा इथल्या रेस्टॉरंटमध्ये रात्री जेवण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने दारुच्या नशेत तिच्या जवळ आला. (chinese influencer detained staging sexual harassment restaurant incident vrial videos to gain followers online traffic)

तिने व्हायरल केलेल्या व्हिडीओमध्ये असं दाखविण्यात आलं की, त्या व्यक्तीने तिची परवानगी न घेता हा व्हिडीओ रेकार्ड करायला सुरुवात केली. त्या व्यक्तीने त्यांना मद्यपान करण्यासाठी आग्रह केला. तिने सुरुवातीला त्या माणसाची विनंती नाकारली. आम्ही खरोखर दारु पित नाही, असं स्पष्ट सांगितलं. त्यावर तो अनोळखी व्यक्ती म्हणाला की, फक्त एक ग्लास, चल एक ग्लास दारु पिऊ आणि मैत्री करु. 

तिने परत त्याला नाकार दिला. आम्हाला सर्दी झाली आणि आम्ही पिऊ शकत नाही, माफ करा. त्यावर तो व्यक्ती म्हणाला की, आम्हाला सर्दी झाली की आम्ही दारु पितो, अल्कोहोल तुम्हाला निर्जंतूक करतं. तो असंही म्हणाला की, एक ग्लास प्यायल्याने आपली मैत्री होईल आणि माझे सर्व मित्रं इथे आहेत, मला थोडा भाव मिळेल. 

व्हिडीओच्या सबटायटल्समध्ये असं लिहिलं होतं की, शेन या क्षणी रागावली होती मात्र ती आमि तिचा मित्र त्या माणसाला विरोध करण्यासाठी घाबरत होते.  तो व्यक्ती मोठ्या चिकाटीने म्हणाला की, “फक्त एक ग्लास. जेव्हा कोणी तुम्हाला टोस्ट करते तेव्हा ही शिष्टाचाराची बाब आहे.” असंही तो तिला म्हणाला.  तो पुढे असंही म्हणाला की, “मला फक्त तुझ्याशी मैत्री करायची आहे. संपर्क वाढविण्यासाठी माहितीची देवाणघेवाण करु आणि एकमेकांना जाणून घेऊयात. 

यावर शेनने उत्तर दिलं की,  “मला माफ करा, माझा एक बॉयफ्रेंड आहे आणि मी तुम्हाला WeChat वर जोडू शकत नाही. माझा प्रियकर खूप आक्रमक आहे; तो अपमानास्पद आणि हिंसक आहे. मी खरंच करू शकत नाही.” एवढं सांगूनही तो व्यक्ती शेनवर दबाव टाकत होता.  “मग तुझा प्रियकर तुझ्यासाठी चांगला नाही. तुझ्यासाठी मी चांगला आहे. आम्ही महिलांसाठी सज्जन आहोत,” असं म्हणून तो शेनला आग्रह करु लागला. 

त्या व्यक्तीच्या कृत्याने शेन आणि तिचा मित्र घाबरले होते. त्यांनी पटकन जेवण्याचं बिल दिलं आणि ते तिथून निघाले. त्यानंतर काही सेकंदाच या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यूजर्सलाही ही घटना खरी वाटली. अनेकांना चीनमधील जुन्या महिलांवरील छळाच्या घटना समोर आल्यात. त्यातील एक घटना म्हणजे उत्तर चीनमधील एका रेस्टॉरंटमध्ये एका दारूच्या नशेत असलेल्या पुरुषाने एका महिलेला बेदम मारहाण केली होती. हा व्हिडीओ पाहून यूजर्सला त्या घटनेची आठवण झाली. 

हा व्हिडीओ सोशल मीडिया इंटरनेटवर वाऱ्यासारखा पसरत होता. त्यामुळे स्थानिक पोलीस आणि चीनच्या इंटरनेट अधिकाऱ्यांनी या व्हिडीओमागील घटनेचा छडा लावण्यास सुरु केली. या व्हिडीओची सखोल चौकशी करत असताना पोलिसांना धक्काच बसला. चीनमधील महिलांवरील छळाची घटनेचा ट्रेंड चालू राहवा म्हणून शेनने आणि इतर तीन जणांनी हा व्हिडीओ बनवला होता, असं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी शेन आणि इतर तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. 

Related posts