पगडीवरुन अपमान, सूडाने पेटत विकत घेतल्या 15 रोल्स रॉयल्स; रोज वापरतात पगडीच्या रंगाला मॅचिंग होणारी कार

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ruben Singh Car Collection: आयुष्यात पैसा आला तर रोल्स रॉयस कार खरेदी करायची असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. जगातील प्रतिष्ठित ब्रँड्समध्ये या कारचा समावेश आहे. दरम्यान, काहींना आपलं हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळते. यामध्ये भारतीय वंशाच्या एका ब्रिटीश नागरिकाचाही समावेश आहे. पण रुबेन सिंग यांनी एक, दोन नव्हे तर 15 पेक्षा अधिक रोल्स रॉयस खरेदी केल्या आहेत. इतकंच नाही तर ते आपल्या पगडीच्या रंगाला मॅचिंग होणारी रोल्स रॉयस घेऊन फिरतात. आपल्या ऑटोमोबाइल कलेक्शनमुळे रुबेन सिंग आंतरराष्ट्रीय स्तरावर सोशल मीडियावर चर्चेत आहेत. 

कोण आहेत रुबेन सिंग?

यूकेमधील AllDayPA चे सीईओ रूबेन सिंग हे प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. पण, दुर्दैवाने एकदा त्याला केवळ पगडी घालण्याच्या परंपरेमुळे एका इंग्रजाकडून त्यांना अपमान सहन करावा लागला होता. या अपमानाला उत्तर देताना रुबेन सिंग यांनी एक आव्हान स्वीकारलं. त्यांनी आपल्या पगडीच्या रंगाला मॅच होणारी रोल्स रॉयल चालवण्याचा निर्णय घेतला. यानंतर रुबेन सिंग यांनी सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या रोल्स रॉयस कारचं कलेक्शनही दाखवलं होतं. यामध्ये एकूण सात गाड्या आहेत. या फोटोत रुबेन सिंग अत्यंत स्टायलिशपणे गाड्यांमध्ये उभे असल्याचं दिसत आहे. 

रुबेन सिंग त्यांच्याकडे असलेल्या रोल्स-रॉयस कारच्या संख्येवर खूश नव्हते, ज्यामुळे त्यांनी काही वर्षांपूर्वी सहा नवीन रोल्स-रॉयस गाड्यांची ऑर्डर दिली होती, ज्यामध्ये तीन फॅंटम VIII आणि तीन कलिनन एसयूव्हीचा समावेश होता. या सहा गाड्यांच्या नवीन कलेक्शनला मौल्यवान रत्नांनी कस्टमाइज डिझाइन करण्यात आलं आहे, ज्याला ‘ज्वेल्स कलेक्शन’ असं नाव देण्यात आलं आहे. सिंग यांनी अलीकडेच विकत घेतलेल्या रोल्स रॉयस कारसाठी रुबी, एमराल्ड आणि नीलम सारखे रंग निवडले आहेत.

रुबेन सिंग यांच्याकडे इतर गाड्यांचंही कलेक्शन

रुबेन सिंग यांच्या कार कलेक्शनमध्ये फक्त रोल्स रॉयस नाही, तर इतरही आलिशान गाड्या आहेत. ज्यामध्ये पोर्शे 918 स्पाइडर, बुगाटी वेरॉन, पगानी हुयारा, लेम्बोर्गिनी हुराकन आणि एक लिमिटेड एडिशन फेरारी एफ12 बर्लिनेटा यांचा समावेश आहे. इतकंच नाही तर त्यांच्याकडे प्रायव्हेट जेटही आहे. काही वर्षांपूर्वी ते ब्रिटीश सरकारमध्ये प्रमुख पदावर होते. 

किंमत किती?

रुबेन सिंग यांच्या ताफ्यात असणाऱ्या प्रत्येक फँटमची किंमत जवळपास 3 लाख 60 हजार पाऊंड इतकी आहे. तर कलिनन एसयुव्हीची किंमत जवळपास 2 लाख 50 हजार ब्रिटीश पाऊंड आहे. ज्यामध्ये कस्टमायजेशनची किंमत सहभागी नाही. 

भारतात रोल्स रॉयस कलिननची किंमत जवळपास 9 कोटी 50 लाख आहे. तर फँटम VIII ची  किंमत जवळपास 6.95 कोटी इतकी आहे. भारतार मर्यादित संख्येत कलिनन एसयुव्ही आहेत. ज्यामधील एक अंबानी यांच्याकडे आहे आणि दुसरी टी-सीरिजच्या मालकांकडे आहे. 

Related posts