( प्रगत भारत । pragatbharat.com)
Indian Railway Palace on wheels : रेल्वेचा प्रवास अनेकदा केलेला असला तरीही प्रत्येक वेळी तो तितकाच खास असतो. रेल्वे स्थानकावर जाण्यापासून कोणत्या आसनावर बसायचं, लांबच्या प्रवासात वेळ कसा घालवायचा इथपर्यंतचे बेत आखणारे तुमच्याआमच्यापैकी अनेकजण असतील. यामध्ये प्रवासादरम्यान काय खायचं, हा प्रश्नही आपण स्वत:लाच विचारतो आणि मग त्या अनुषंगानं तयारी सुरु होते. काही मंडळी रेल्वेमध्येच मिळणाऱ्या जेवणाला प्राधान्य देतात. आता सर्वसामान्यपणे लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमध्ये जेवणात काय मिळतं हे आपण सर्वजण जाणतो.
चहा- बिस्कीटापासून, (Veg, Non Veg food) शाकाहारी आणि मांसाहारी पद्धतीच्या जेवणाची Pre Arranged थाळी तुम्हाला रेल्वेतर्फे सर्व्ह केली जाते. अधूनमधून स्नॅक्सही मिळतातच. पण, जर तुम्हाला सांगितलं की भारतीय रेल्वेच्या एका ट्रेनमध्ये पंचतारांकित हॉटेलसारखं, किंबहुना त्याहूनही कमाल जेवण मिळतं तर? इथं तुम्हाला फक्त चवदार जेवणच मिळत नाही, तर ते खाताना अद्वीतीय वातावरण निर्मितीही पाहायला मिळते. कारण, ही पंगत एका सुरेख अशा टेबलावर सजते आणि मग सुरुवात होते मेजवानीला.
पॅलेस ऑन व्हील्सचा राजेशाही थाट
राजस्थान पर्यटन विभाग आणि भारतीय रेल्वे यांच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या भारतातील पहिली लक्झरी ट्रेन असणाऱ्या पॅलेस ऑन व्हील्स या ट्रेनमध्ये दोन रेस्तराँ आहेत. महाराजा आणि महारानी अशी त्यांची नावं. भारतीय, कॉन्टीनेंटल आणि चायनीज पद्धतीचं जेवण इथं सर्व्ह केलं जातं. पाच विभागांमध्ये या ट्रेनचं मेन्यूकार्ड विभागलं गेलं आहे. यामध्ये सूप, सॅलड, दोन प्रकारचे खाद्यपदार्थ आणि गोडाच्या पदार्थाचा समावेश असतो. इथं तुम्ही शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारचं जेवण जेवू शकता.
ब्रेकफास्टपासूनच सुरुवात…
पॅलेस ऑन व्हील्समध्ये ब्रेकफास्टमध्ये ताज्या फळांपासून, फ्रुट ज्युस, ब्रेकफास्ट रोल्स, अंड, हॅम, सॉसेज, बेकनचा समावेश असतो. सोबत चहा आणि कॉफीची जोड आलीच. आरोग्यदायी नाश्ता करणाऱ्यांसाठी इथं ओट्स आणि फ्रुट सॅलडचाही पर्याय असतो.
मुख्य जेवणामध्ये इथं पनीर नजाकत, चिकन शाहजहांनी, पनीर लवाबदार, बटर चिकन, मटन खड़ा मसाला असे पदार्थ मिळतात. याशिवाय दाल महारानी, मेथी मलाई मटर, तंदूर चिकन, पनीर टिक्का, दाल मखनी आणि मटन सागवालाही सर्व्ह केलं जातं. जेवणामध्ये दूध, तूप, ज्वारी – बाजरी, असे राजस्थानी जेवणांमध्ये सर्वाधिक वापरले जाणारे घटक असतात. गोडाच्या पदार्थांमध्ये इथं विविध प्रकारची मिठाई, आईस्क्रीम असे एक ना अनेक पदार्थ दिले जातात.