[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
N Uma Harathi: Uma Harti N हिनं UPSC 2022 च्या परीक्षेत तिसरा क्रमांक पटकावला आहे. उमा यांनी आपल्या यशाचं संपूर्ण श्रेय आपल्या आयपीएस वडिलांना दिलं आहे. उमाचे वडील एन व्यंकटेश्वरलू सध्या तेलंगणातील नारायणपेट जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (SP) म्हणून कार्यरत आहेत.
उमा हर्थीनं आयआयटी-हैदराबाद येथून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बीटेकचं शिक्षण घेतलं आहे. अॅन्ड्रोलॉजी (Andrology) हा पर्यायी विषय घेऊन उमा परीक्षा उत्तीर्ण झाली. तिनं पाचव्या प्रयत्नात परीक्षेत यश मिळवलं आहे. माझ्या यशात माझ्या वडिलांचा शंभर टक्के वाटा असल्याचं उमानं सांगितलं आहे.
यशामागे कुटुंब आणि मित्रांचा पाठिंबा : उमा हर्थी
यासोबतच उमा हर्थीनं आपल्या यशासाठी कुटुंबीय आणि मित्रांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत. ती म्हणाली की, “पुरुष असो किंवा स्त्री, ध्येय साध्य करण्यासाठी कुटुंबाचा पाठिंबा आवश्यक असतोच. कुटुंबामुळेच मी परीक्षेची तयारी करू शकले.” ती पुढे म्हणाली की, “मला फक्त चांगला रँक मिळण्याची अपेक्षा होती, मी तिसरा क्रमांक पटकावेल असं अजिबात वाटलं नव्हतं.”
तरुणांनी निराश होऊ नये : उमा हर्थी
उमा म्हणाली की, या परीक्षेसाठी भावनिक आधार, कौटुंबिक आधाराची गरज आहे. माहिती आणि सामग्री, पुस्तकं ऑनलाईन उपलब्ध आहेत, पण भावनिक आधार, कौटुंबिक आधार मिळत नाही. ज्यांना यश मिळालं नाही, त्यांनी अजिबात निराश होऊ नये, स्वतःचं उदाहरण देताना ती म्हणाली, गेल्या पाच वर्षांत मी माझ्या तयारीत अनेकदा अपयशी झाले आहे.
Reels
पालकांना संदेश
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांच्या पालकांना सल्ला देताना उमा म्हणाली की, त्यांनी आपल्या मुलांना त्यांच्या क्षमतेवर शंका न ठेवता त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करू द्यावा. उमाचे वडील आपल्या मुलीच्या यशावर खूप आनंदी आहेत. मुलीच्या यशाबाबत बोलताना ते म्हणाले की, तिनं नारायणपेठ जिल्ह्याला नावलौकिक मिळवून दिला आहे. एन व्यंकटेश्वरलू यांनी सांगितलं की, तिचं हे यश सहज मिळालेलं नाही, परंतु उमानं अनेक प्रयत्नांनंतर नियोजन करून हे यश मिळवलं आहे. यासाठी गेल्या 10 वर्षांपासून कुटुंबीयांनी पाठिंबा दिला आहे.
विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं आणि अनावश्यक गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवू नये, असा सल्लाही उमाच्या वडिलांनी दिला. नागरी सेवा परीक्षा 2022 साठी 933 यशस्वी उमेदवारांपैकी 613 पुरुष आणि 320 महिला पात्र ठरल्या आहेत. तसेच, टॉप 25 उमेदवारांमध्ये 14 महिला आणि 11 पुरुषांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
[ad_2]