‘माझा मुलगाच सचिनला संपवेल’; सीमा हैरदरच्या पाकिस्तानातील पतीची थेट धमकी

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पाकिस्तानातून (Pakistan) आपल्या प्रियकरासाठी नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आलेली सीमा हैदर (Seema Haider) गेल्या काही दिवसांपासून फार चर्चेत आहे. सीमा हैदर तिच्या चार मुलांसह उत्तर प्रदेशातील सचिन मीनाकडे (Sachin meena) आली आहे. सीमा ऑनलाईन गेमच्या माध्यमातून ग्रेटर नोएडामधील सचिनच्या प्रेमात पडली होती. त्यानंतर तिने बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला होता. याप्रकरणात अटक झाल्यानंतर पोलिसांनी सीमा आणि सचिनला अटक केली होती. पण नंतर दोघांनाही जामीन मिळाला होता. आता मात्र सीमाच्या पाकिस्तानातील पती गुलाम हैदरने (ghulam haider) तिला थेट धमकी दिली आहे.

सीमा हैदर भारतात आल्यापासून तिचा पाकिस्तानातील पती हा सातत्याने प्रतिक्रिया देत आहे. सौदी अरेबियात बसून तो वारंवार सीमावार राग व्यक्त करत आहे. गुलामने आता त्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सचिन मीनाला फटकारले आहे. माझा मुलगाच सचिनला संपवणार असल्याचे गुलामने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. या व्हिडीओमुळे आता पुन्हा सीमा आणि सचिनची चर्चा सुरु झाली आहे.

‘डिजिटल मोहसीन’ या यूट्यूब चॅनलवरुन गुलाम हैदरने धमकी दिली आहे. “सीमा हैदर एक आई असूनही मुलांचा विचार करत नाही. ती म्हणत होती की गुलाम आल्यावर मी दार उघडणार नाही. तुझ्या जवळ कोणाला यायचे आहे? मुलांना घेण्यासाठी मी न्यायालयात जाणार आहोत. कोर्टाच्या माध्यमातूनच मुलांची भेट घेणार आहे. सीमाला हैदरपासून नक्कीच धोका आहे. मी सचिन, सीमा आणि एपी सिंह यांना कधीही माफ करणार नाही. त्याने त्याच्या मांडीवर घेतलेली मुले ही माझी आहेत. मुले मोठी झाल्यावर सचिनचा गळा दाबून टाकतील. ते स्वतःच सचिनचा गळा दाबतील. मी या मुलांना सोडले तरी ते मोठी झाल्यावर सचिनला सोडणार नाहीत,” अशी धमकी हैदरने या व्हिडीओमध्ये दिली आहे.

एपी सिंहला माहिती नाही की सीमाचे सगळं कुटुंब तिच्या मागे आहे. तिच्या कुटुंबातील फक्त दोघांचा मृत्यू झाला आहे आणि बाकी सगळे जिवंत आहेत. सीमाच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा तिने मला सांगितले होते. त्यानंतर मी तिला मित्राकडून 50 हजार रुपये घेऊन तिला दिले होते, असेही हैदरने व्हिडीओमध्ये सांगितले.

सीमा हैदरने वकील एपी सिंहला बांधली राखी

सीमा हैदरने तिचे वकील एपी सिंह यांना राखी बांधली आहे. मला एपी सिंगसारखा मोठा भाऊ मिळाल्याचा आनंद आहे. ते स्वतः माझ्यासोबत राखी बांधायला आले हे माझे भाग्य आहे, असे सीमा हैदरने म्हटलं आहे. त्याचवेळी एपी सिंग यांनी सीमा हैदरच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि सीमाला कोणत्याही किंमतीत भारताचे नागरिकत्व मिळवून देणार असल्याचे सांगितले. 

Related posts