Delhi Auto Rikshaw Drive on the pedestrian bridge video went viral;ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी पादचारी पूलावर चढवली रिक्षा, व्हिडीओ व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Delhi Auto Rikshaw: ट्रॅफिकमधून वाट काढण्यासाठी तुम्ही काय करता? सिग्रल सुटण्याची वाट पाहता? गर्दी कमी होईपर्यंत थांबता? जास्तीत जास्त हॉर्न वाजवता! पण दिल्लीतला एक रिक्षावाला या सर्वांच्या पलीकडे गेलाय. त्यामुळेच दिवसभर तो सोशल मीडियात चर्चेचा विषय बनला आहे. 

दक्षिण दिल्लीतील हमदर्द नगरमधील संगम विहार परिसरात रोज ट्रॅफिक जाम असते. अनेक गाड्या इथे ताटकळत असतात. पण या रिक्षावाल्याने ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी शक्कल लढवली. त्याने हे आपली रिक्षा थेट फूटओव्हर ब्रिजवर नेली. हे पाहून आजुबाजूचे आवाक् झाले. हा रिक्षावाला नक्की काय करतोय? हेच सुरुवातीला काही जणांना कळाले नाही. त्यानंतर ऑटोचालकाचे हे कृत्या कोणीतरी कॅमेऱ्यात कैद केले. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान दिल्ली वाहतूक पोलिसांनी रिक्षावाल्यावर कडक कारवाई केली आहे. 

3 सप्टेंबर रोजी संगम विहार येथे बराच वेळ ट्रॅफिक जाम झाला होता. ऑटोचालकाने बराच वेळ जाम संपेल याची वाट पाहिली.पण यानंतर त्याचे पेशन्स संपले आणि त्याने फूट ओव्हरब्रिजवर ऑटो नेली. ऑटो फूट ओव्हरब्रिजवरुन चालत असताना एक जमावही तेथून जात होता. 

ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रिक्षाचालकावर तात्काळ केली. आरोपी ऑटोचालक मुन्ना (25 वर्षे) आणि त्याचा साथीदार अमित यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची रिक्षाही जप्त करण्यात आली. 

मुन्ना रिक्षा चालवत होता तर अमित ती मागून ढकलत होता. दोघेही संगम विहार येथील रहिवासी आहेत. ऑटो (एचआर 55 एजी 2941) डीपी कायद्याच्या कलम 66 अंतर्गत जप्त करण्यात आली असून आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती डीसीपींनी दिली. 

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही क्लिप @HasnaZaruriHai हँडलवरुन मायक्रोब्लॉगिंग साइट X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करण्यात आली होती.  दिल्लीच्या हमदर्द नगर रेड लाइट संगम विहार ट्रॅफिक सर्कल येथे जाम झाल्यामुळे ऑटो चालकाने कार फूटओव्हर ब्रिजवर वळवली, असे त्याने यावर कॅप्शन लिहिले आहे. 

या व्हिडीओवर अनेक व्ह्यूज आणि लाईक्स आणि प्रतिक्रिया येत आहे. यावर एकानेटेक इट रेसिंग, अशी प्रतिक्रिया दिली. 

Related posts