[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) अनहेल्दी लाइफस्टाइल आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या वेळा यामुळे अनेक गंभीर आजार सध्या होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये हायपर अॅसिडिटीचीदेखील भर पडते. Hyperacidity तेव्हाच होते जेव्हा पोटात अतिरिक्त अॅसिडचे उत्पादन सुरू होते. आयुर्वेदातील आम्लपित्त म्हणून ओळखला जाणाऱ्या या आजाराकडे खरं तर अनेकदा दुर्लक्ष होतं. पण असं अजिबात करू नका. काही लोकांच्या तोंडून काहीही खाल्ल्यानंतर आंबट ढेकर येत आहेत असं आपण ऐकतो. जेवल्यानंतर अथवा काहीही खाल्ल्यानंतर हे आंबट ढेकर येऊ नयेत म्हणून बाजारातील काही औषधंही घेतली जातात. मात्र मुळापासून हा आजार दूर करण्यासाठी तुम्हाला योगासन हा उत्तम उपाय आहे. हापयरअॅसिडिटीपासून सुटका मिळविण्यासाठी कोणते योगासन उपयुक्त ठरू शकते जाणून घ्या, योगाभ्यासक दिलीप पाटील यांच्याकडून. (फोटो सौजन्य – iStock)
[ad_2]