Delhi News 2000 Year Old Decorated Gold Foil Lotus Symbol Found At Purana Qila; दिल्लीत किल्ल्यातून हाती लागला मोठा खजिना, ASI ला सापडल्या २००० वर्षे जुन्या अनोख्या वस्तू

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ला दिल्लीच्या पुराण किल्ला इथे लाल वाळूच्या दगडावर कोरलेले २००० वर्षे जुने सोन्याचे काम आणि कमळाचे चिन्ह सापडले आहे. पुराण किल्यात पांडवांची राजधानी शोधण्यासाठी उत्खननात करण्यात आलं होतं. यावेळी या विशेष वस्तू सापडल्या आहेत. या शोधावरून इथे उच्चभ्रू वर्गातील नागरिक राहत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. इतकंच नाहीतर या कामात गुंतलेल्या एएसआयच्या टीमला विटा, अर्धी आणि पूर्णपणे बनवलेली भांडी बनवण्यासाठी खास जागा सापडली आहे.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) चे संचालक वसंत के. यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कामात कासवाच्या आकाराचे ताबीज, हस्तिदंती ताबीज, महिलेचा टेराकोटा फलक, पाचूचे मणी, शेलच्या वस्तू, तांब्याच्या छिन्नी, मंदिराच्या संरचनात्मक घटकांचे काही भाग आणि तांब्याची नाणी सापडली आहेत. उत्खननादरम्यान कुशाण काळातील बाण आणि भालेही सापडल्याचे त्यांनी सांगितले.

Maharashtra Rain Alert : राज्यात पुढचे काही तास महत्त्वाचे, मुंबई, ठाण्यासह १३ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या प्रवक्त्याने सांगितले की, उत्खननात सील आणि नाणी, प्रवाळ, स्फटिक, विविध प्रकारचे मणी, फासे, लोखंडी आणि तांब्याची साधने देखील सापडली आहेत. गुप्त काळातील (५वे व सहावे शतक) तांबे व टेराकोटाचे बाण व चाकेही सापडली आहेत. याआधी या ठिकाणाहून भगवान विष्णू, लक्ष्मी, भगवान गणेश आणि पेंटेड ग्रे वेअर संस्कृतीशी संबंधित काही मातीची भांडी सापडली आहेत. अनेक शतकांपूर्वी जमिनीखाली गाडलेली अनेक ठिकाणे आणि त्यांच्याशी संबंधित पुरावे आता या उत्खननादरम्यान समोर येत आहेत.

१९५४-५५ नंतर, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने १८६९ आणि १९७३, २०१३-१४ आणि २०१७-१८ मध्ये पुराण किल्लामध्ये उत्खनन कार्य केलं. पांडवांची राजधानी इंद्रप्रस्थ हा सध्याचा दिल्लीचा जुना किल्ला आहे, अशी समज आहे. पश्चिम दिल्लीतील एका गावात सापडलेल्या शिलालेखात इंद्रप्रस्थचा उल्लेख आहे.

El Nino Effect India : पृथ्वीच्या इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष २०२३, भारतापासून अमेरिकेपर्यंत झाला मोठा परिणाम…

[ad_2]

Related posts