( प्रगत भारत । pragatbharat.com)
एखाद्या अज्ञात किंवा अनोळखी ठिकाणी जाण्यासाठी आपण सर्रासपणे गुगल मॅपचा वापर करतो. जेणेकरुन आपण रस्ता चुकू नये आणि योग्य ठिकाणी पोहोचू अशी अपेक्षा असते. पण अनेकदा हे गुगल मॅप चुकीचा रस्ता दाखवतात, ज्यामुळे आपण भरकटतो आणि वेगळ्याच ठिकाणी पोहोचतो. तसंच अनेकदा अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात ज्याचा आपण विचारही केलेला नसतो. दरम्यान, एका व्यक्तीलाही असाच अनुभव आला, पण त्याने असं काही पाहिलं की त्याचा संसारच उद्ध्वस्त झाला. घरातून निघाल्यानंतर त्याने गुगल मॅपवर असं काही पाहिलं की, त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
गुगल मॅपवर दिसली पत्नी
गुगल मॅपवर अनेकदा रस्त्यांचे काही जुने झूम इन फोटो असतात, जे आपण कधीही पाहू शकतो. हेच फोटो पाहत असताना या व्यक्तीला एका फोटोत आपली पत्नी दिसली. पण हा फोटो पाहिल्यानंतर त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. इतकंच नाही तर या फोटोमुळे प्रकरण घटस्फोटापर्यंत गेलं.
याचं कारण फोटोत पत्नी एका बेंचवर बसलेली होती. यावेळी ती एका अन्य पुरुषासह होती आणि दोघेंही इंटिमेट झाले होते. त्यामुळे हा फोटो गुगल मॅपवर पाहिल्यानंतर पती संतापला.
पत्नी बेंचवर बसलेला असताना, एक व्यक्ती तिच्या मांडीवर झोपलेला होता. पत्नी यावेळी त्याचे केस गोंजारत होती. पेरुची राजधान लीमा येथे हे गुगल कॅमेऱ्याने हे फोटो काढण्यात आले होते. पतीने फोटो झूम करुन पाहिला असता त्याला कपडे ओळखीचे दिसले. यानंतर चेहरा पाहिल्यानंतर ही आपलीच पत्नी असल्याची त्याची खात्री पटली.
विशेष म्हणजे हा फोटो 2013 मधील आहे. पण पतीने हा फोटो तब्बल इतक्या वर्षांनी पाहिला. याचा अर्थ गेल्या इतक्या वर्षांपासून पत्नी त्यची फसवणूक करत होती. हा फोटो समोर आल्यानंतर पतीने आपले विवाहबाह्य संबंध असल्याचं मान्य केलं आणि दोघांनी सहमतीने घटस्फोट घेतला.
पीडित पतीने हे फोटो आपल्या फेसबुकला शेअर केले आहेत. यानंतर नेटकऱ्यांनी या फोटोवर बऱ्याच कमेंट केल्या आहेत. एका सोशल मीडिया युजरने म्हटलं आहे की, हे किती छोटं जग आहे. यापेक्षा तिने आपल्या पतीला आता मी तुझ्यावर प्रेम करत नाही सांगितलं असं तर किती सोपं गेलं असतं.