Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला विशेष योग! 3 राशींच्या मंडळींवर बसरणार बाप्पांची कृपा

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ganesh Chaturthi 2023 : दरवर्षी प्रमाणे यंदाही बाप्पा वाजतगाजत येणार आहे. अख्खा देश 19 सप्टेंबरपासून बाप्पामय झालेला असेल. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी असं म्हणतात. लाडक्या बाप्पाची सेवा करण्यासाठी भक्त आतुरतेने वाट पाहत आहे. यंदा गणेश चतुर्थीला विशेष योग जुळून आला आहे. त्यामुळे तीन राशींच्या लोकांसाठी तो वरदान ठरणार आहे. (ganesh chaturthi festival in auspicious yoga these 3 zodiac signs get blessings and money)

19 सप्टेंबरला गणेश चतुर्थीसोबतच वैधृती योगसोबत स्वाती नक्षत्र आणि विशाखा नक्षत्राचा संयोग जुळून आला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हा विशेष योग अतिशय शुभ असून कोणत्या राशींसाठी तो फायदेशीर ठरणार आहे जाणून घेऊयात. 

‘या’ राशींवर बसरणार बाप्पाची कृपा !

मेष (Aries Zodiac) 

गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर मेष राशीच्या लोकांवर बाप्पांचा आशिर्वाद लाभणार आहे. या राशींच्या लोकांची सर्व कामं मार्गी लागणार आहे. तुमच्या सर्व इच्छा बाप्पाच्या कृपेने पूर्ण होणार आहे. घरात आणि जीवनात आनंदाचं आगमन होणार आहे. या लोकांना कधीही पैशाची कमरता जाणविणार नाही. 

उपाय – या लोकांनी गणेश चतुर्थीच्या वेळी बाप्पाची पूजा करुन सिंदूर अर्पण करावे. बाप्पाच्या चरणावरील सिंदूर कपाळी लावल्यास फायदा होईल. 

मिथुन (Gemini Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी गणेश चतुर्थी खूप शुभदायी असणार आहे. गणेश चतुर्थीपासून या लोकांच्या यशाचं मार्ग मोकळे होणार आहे. या लोकांवर बाप्पाची कृपा बरसणार आहे. करिअरमध्ये प्रगती आणि नवीन संधी चालून येणार आहे. या लोकांच्या जीवनात सुख समृद्धीत वाढ होणार आहे. 

उपाय – गणेश चतुर्थीला बाप्पाच्या चरणी दुर्वा अर्पण करा. तुम्हाला अधिक फायदा होईल. 

मकर (Capricorn Zodiac)

या राशीच्या लोकांसाठीही विनायक चतुर्थी अतिशय भाग्यशाली असणार आहे. आर्थिक लाभासोबतच या लोकांचा समाजात मान-सन्मान वाढणार आहे. या लोकांसाठी यशाचे नवे मार्ग खुले होणार आहेत.

उपाय – या लोकांनी दररोज गणेशाची पूजा करावी आणि गूळ अर्पण करावा.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts