आज विश्वकर्मा पूजा! 50 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग, नोकरीत प्रगतीसाठी करा ‘हे’ उपाय |Vishwakarma Jayanti 2023 17 september 2023 auspicious yoga upay get money

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Vishwakarma Puja 2023 : आज विश्वकर्मा जयंती आहे. दरवर्षी कन्या संक्रांती म्हणजे सूर्य ग्रह कन्या राशीत प्रवेश करतो तो दिवस भगवान विश्वकर्मा पूजा केली जाते. भगवान विश्वकर्मा हे सृष्टीचे देवता मानलं जातं. यंदा तब्बल 50 वर्षांनंतर विश्वकर्मा पूजेचा अत्यंत दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. आजच्या शुभ दिवशी आर्थिक आणि करिअरच्या प्रगतीसाठी वैदिक ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आला आहे. (Vishwakarma Jayanti 2023 17 september 2023 auspicious yoga upay get money )

विश्वकर्मा जयंती 2023 मुहूर्त (Vishwakarma Jayanti 2023 Muhurat)

सकाळचा मुहूर्त –  सकाळी 07.50 ते दुपारी 12.26 वाजेपर्यंत
दुपारचा मुहूर्त – दुपारी 01.58 – दुपारी 03.30 वाजेपर्यंत

विश्वकर्मा पूजा 2023 शुभ योग (Vishwakarma Puja 2023 Shubh Yoga)

ज्योतिषशास्त्रानुसार 50 वर्षांनंतर विश्वकर्मा पूजेच्या दिवशी अमृत योग, सर्वार्थ सिद्धी योग, ब्रह्म योग आणि द्विपुष्कर योग जुळून आले आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रात हे सर्वात शुभ मानले जातात. या योगात केली कार्य आणि तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आहेत. 

सर्वार्थ सिद्धी योग – सकाळी 06.07 – सकाळी 10.02 वाजेपर्यंत
द्विपुष्कर योग – सकाळी 10.02 ते 11.08 वाजेपर्यंत
ब्रह्मयोग – पहाटे 04.13 ते 18 सप्टेंबर 2023 ला पहाटे 04.28 वाजेपर्यंत 
अमृत ​​सिद्धी योग – सकाळी 06.07 ते सकाळी 10.02 वाजेपर्यंत

विश्वकर्मा पूजा उपाय (Vishwakarma Puja Upay)

नोकरीत प्रगतीसाठी उपाय

विश्वकर्मा पूजेच्या दिवशी एखाद्या शुभ मुहूर्तावर भगवान विश्वकर्माची पूजा करा. देवाला फुलं, हळद, कुंकू, नारळ अर्पण करा. आजच्या दिवशी कुष्ठरुग्णांना फळं, पाणी किंवा अन्नदान करा. या उपायामुळे करिअरमध्ये तुमची प्रगती होईल असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे. 

आर्थिक प्रगतीसाठी उपाय 

विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी कामाच्या ठिकाणी यंत्राची पूजा करा. पूजेनंतर ऊं आधार शक्तपे नम: या मंत्राचा जप करा. या उपायानंतर करिअर आणि व्यवसायात प्रगती होते. यातून तुम्हाला आर्थिक फायदा होतो. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts