Rishi Panchami 2023 : आज रवि योगावर ऋषी पंचमी! महिलांसाठी व्रताला महत्त्व, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि मंत्र

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rishi Panchami 2023 : सर्वत्र गणेशोत्सवाची धूम असताना आज भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी असून आज ऋषी पंचमी साजरी केली जाणार आहे. गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi 2023) दुसऱ्या दिवशी हे व्रत करण्यात येतं. या दिवशी सप्त ऋषींची उपासना केली जाणार आहे. महाराष्ट्रात आजच्या दिवशी ऋषीची भाजी करण्याची पंरपंरा आहे.ऋषी पंचमीचं व्रत महिलांसाठी अतिशय खास आहे. अखंड सौभाग्यसाठी महिला हे व्रत करतात. (Rishi Panchami 2023 Shubh Muhurat Puja Vidhi Puja Samagri Mantra Katha Aarti significance in marathi)

ऋषी पंचमी 2023 शुभ मुहूर्त

भाद्रपद शुक्ल पंचमी तिथी 19 सप्टेंबर 2023 दुपारी 01:43 वाजेपासून 20 सप्टेंबर 2023 दुपारी 02:16 वाजेपर्यंत असणार आहे. 

सप्त ऋषींच्या पूजा मुहूर्त – सकाळी 11.01 वाजेपासून दुपारी 01.28 वाजेपर्यंत

ऋषिपंचमी म्हणजे काय?

या दिवशी महान सप्त ऋषींची पूजा केली जाते. ऋषी कश्यप, ऋषी अत्री, ऋषी भारद्वाज, ऋषी विश्वामित्र, ऋषी गौतम, ऋषी जमदग्नी आणि ऋषी वशिष्ठ यांची आराधना करण्यात येते. असं म्हणतात की ऋषीपंचमीचे व्रत पाळणाऱ्या आणि ऋषींची पूजा करणाऱ्या महिला सर्व पापापासून मुक्तता मिळते. म्हणून या दिवसाला ऋषी पंचमी असं म्हणतात. 

कशी करावी पूजा?

ऋषीपंचमीच्या दिवशी महिलांनी एका छोट्या टेबलावर लाल किंवा पिवळा कपडा घालावा. त्यानंतर सात ऋषींचा फोटो ठेवावा. यानंतर फळं, फुलं, धूप, दीप आणि पंचामृत अर्पण करा. त्यानंतर आरती करा. आता ऋषी पंचमीच्या व्रताची कथा वाचा किंवा ऐका. त्यानंतर देवाला ऋषी पंचमीची भाजी नैवेद्य दाखवा. 

महिलांसाठी खास व्रत 

ऋषीपंचमीचं व्रत सवाशीण महिला करतात. असं म्हणतात याच्या दिवशी महिलांनी धान्य खाऊ नये. महाराष्ट्रात ग्रामीण भागात शेताच्या बांध्यावर उगवलेल्या रानभाज्या आणि कंदमुळं खाल्ली जातात. आज शहरामध्येही ऋषीपंचमीला या भाज्या मिळतात. 

ऋषी पंचमीसाठीचा मंत्र कोणता आहे?

कश्यपोतीर्थरद्वाजो विश्वामित्रोय गौतम:.

जमदगनिनिर्वशेषाचा सप्तैते ऋष्य: स्मृती:

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts