Pitru Paksha 2023 : पितृ पक्षात 30 वर्षांनी दुर्मिळ योग! 5 राशींच्या लोकांची करिअरमध्ये प्रगती, धनलाभाची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shradh 2023 October Horoscope : देशासह राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरु आहे. येत्या गुरुवारी म्हणजे 28 सप्टेंबर अनंत चतुर्दशीला गणराया आपल्या गावाला परतणार आहे. पंचांगानुसार अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 सप्टेंबरपासून पितृ पक्ष पंधरवडा सुरु होणार आहे. पितृ पक्ष भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन महिन्याच्या अमावस्येला संपतो. यंदा 29 सप्टेंबरपासून सुरू होणार असून 14 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. 

पितृ पक्ष म्हणजे श्राद्ध पक्षाचा काळ हा पितरांना समर्पित असतो. या वेळी लोक त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंड दान आणि तर्पण करतात. यावेळी पितृ पक्ष आणखी खास असणार आहे. कारण 30 वर्षांनंतर पितृ पक्षात सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग जुळून आला आहे. पितृ पक्षात हे दोन शुभ योग एकत्र येणे हे 5 राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे. पितृ पक्षात या लोकांना अचानक धन आणि मोठे यश मिळणार आहे. 

मेष (Aries Zodiac)

 उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. व्यवसायिकाचा व्यवसाय वाढणार आहे. त्यातून तुम्हाला नफा होणार आहे. मित्र आणि कुटुंबाकडून तुम्हाला प्रेम आणि पाठिंबा मिळणार आहे. यांच्या सहकार्याने मोठी कामं सहज होणार आहे. 

मिथुन (Gemini Zodiac)

ऑक्टोबर महिना मिथुन राशीच्या लोकांना गुंतवणुकीतून धनलाभ होणार आहे. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळणार आहे. तुमची कार्यक्षमता वाढणार आहे. करिअरमध्ये प्रगतीचे उंच तुम्ही गाठणार आहात. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. आयुष्यात सुख आणि शांती नांदणार आहे. 

कर्क (Cancer Zodiac) 

कर्क राशीच्या लोकांना नोकरीत उच्च पद मिळणार आहे. तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. वाहन किंवा मालमत्ता खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार आहेत. तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. 

कन्या (Virgo Zodiac) 

कन्या राशीच्या लोकांना ऑक्टोबर महिन्यात अनपेक्षित धनलाभ होणार आहे. नोकरी बदलण्यासाठी देखील ही चांगली वेळ असणार आहे. तुम्हाला तुमच्या आवडीचं काम मिळणार आहे. वैवाहिक जीवन आनंदी आणि शांत नांदणार आहे.

कुंभ (Aquarius Zodiac) 

कुंभ राशीच्या लोकांच्या जुन्या समस्या संपुष्टात येणार आहे. तुमचा तणाव दूर होणार आहे. तुम्हाला मोठा आराम मिळणार आहे. तुमचं उत्पन्न वाढणार आहे. तुम्ही चांगले काम कराल करणार असून तुमची प्रशंसा होणार आहे. खूप दिवसांनी तुम्हाला आयुष्यात शांतता जाणवणार आहे. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts