Ganesh Visarjan Latur Important Visarjan Procession List Ganesh Visarjan 202

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ganesh Visarjan Latur : लातूर शहरातील (Latur City) गणेश विसर्जन (Ganesh Visarjan) मिरवणूक कायमच चर्चेचा विषय असतो. येथील गणेश मंडळ देखाव्यापेक्षा विसर्जन मिरवणुकीत विविध सजीव देखावे घेऊन उतरत असतात. दरवर्षी दहापेक्षा जास्त गणेश मंडळे हे आकर्षक आणि भव्य सजीव देखावा घेऊन विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत असतात. त्यामुळे उद्याच्या गणेश विसर्जनसाठी लातूरकर सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे उद्याच्या विसर्जनात कोणतेही विघ्न न येता व्यवस्थितपणे पार पडावे म्हणून प्रशासनाकडून देखील तयारी करण्यात येत आहे. 

उद्या श्री गणेशाचे विसर्जन व्यवस्थित पार पडावे यासाठी लातूर महानगर प्रशासन सज्ज असल्याचे पाहायला मिळत आहे. लातूर शहरातील 217 मंडळे आणि पन्नास हजार घरगुती मूर्तीचे संकलनाचं मनपाचे नियोजन आहे. शहरातील चार झोनमध्ये पंधरा गणेश मूर्ती संकलन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. एकाच ठिकाणी जास्त गर्दी होऊ नये म्हणून मोठ्या गणेश मंडळाची शहरातील तीन वेगवेगळ्या भागात विसर्जनासाठी नियोजन केले गेले आहे. जास्त लांब न जाता शहरातील पंधरा संकलन केंद्रात जे जवळ असेल त्या ठिकाणी मूर्ती देऊन सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी महानगरपालिकेचे सहाशे कर्मचारी आणि अनेक वाहने कार्यरत राहणार आहेत. तसेच, शहरातील वाहतूक मार्गात बदल देखील करण्यात आले असून, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अशोक हॉटेल, गांधी चौक गंजगोलाई पर्यंतचा मार्ग उद्या सकाळी दहा ते रात्री बारा वाजेपर्यंत बंद असेल. 

‘दक्षिणेश्वर’ औसा हनुमान संस्कृती गणेश मंडळ… 

गेल्या 54 वर्षांपासून लातूर शहरातील गणेश विसर्जनाचा शेवटचा मान असलेला ‘दक्षिणेश्वर’ औसा हनुमान संस्कृती गणेश मंडळ आहे. मागील पंधरा वर्षापासून इथे फायबरची मूर्ती आहे. इको फ्रेंडली गणेश मूर्तीचे विसर्जन केलं जातं. गणेश मूर्तीवर सोन्याच्या आणि चांदीचे दागिने आहेत. मागील दहा वर्षापासून विसर्जन मार्गातील संपूर्ण रस्ता झाडून स्वच्छ करून मगच दक्षिणेश्वर बाप्पाचे मार्गक्रमण होत. रस्ते स्वच्छ करण्यासाठी आणि कचरा उचलण्यासाठी गणेश मंडळातील साडेतीनशे लोक कार्यरत असतात. वीस वर्षापासून डीजे किंवा लाऊड स्पीकरचा वापर या मंडळाने बंद केला आहे. तर, ढोल पथकात सहा वर्षाच्या मुलापासून वृद्धांपर्यंत सर्वांचा समावेश पाहायला मिळतो.  महिलां आणि मुलींचाही लक्षणीय सहभाग असतो. 

विना अध्यक्षाचे रनवाद्य गणेश मंडळ

रनवाद्य गणेश मंडळाचे यंदाचे आठवे वर्षे आहे. विना अध्यक्ष असणाऱ्या या गणेश मंडळात कायमस्वरूपी 300 सदस्य आहेत. सोबतच 101 मुलाचे ढोल पथक आहे. इको फ्रेंडली गणेशाचा सजवलेला फुलांचा रथ विसर्जन मिरवणुकीत पाहायला मिळते. आठ वर्षापासून यांच्या फुलाच्या रथाची कायमच चर्चा होत असते. यावर्षी महाकाली दर्शन या थीमवर आधारित सजीव देखावा आहे.  यात 26 कलाकार महाकालीचे विविध रूपे दाखवणार आहेत. विसर्जन मिरवणूक हनुमान चौकातून दुपारी बारा वाजता सुरू होणार आहे.

बप्पा गणेश मंडळ

बप्पा गणेश मंडळ लातूरतल्या गंजगोलाई मधलं मुख्य आकर्षण आहे. बप्पा गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीतील देखाव्यावर कायमच कौतुकाचा वर्षाव होत असतो. बरसाने की होली, छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा, यासारखे दरवर्षी अनेक सजीव देखावे सादर करत बाप्पा गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक लातूर शहरातील मुख्य चौकातून मार्गक्रमण करते. यावर्षीची थीम कर्नाटकातील “गारुडी गुबी” लोकनृत्य प्रकारचा आहे. तीस कलाकार यात सहभागी असणार आहेत. सोबतच गणेश मंडळाचे ढोल पथक देखील असणार आहे. 

महत्वाच्या विसर्जन मिरवणूक…

  • लातूरच पहिल्या मानाचा आजोबा गणपती
  • विश्वाचा राजा गणपती 
  • हिंद गणेश मंडळ 
  • श्रीराम गणेश मंडळ यांचेही सजीव देखावे
  • रत्नदीप आजाद भारत गणेश मंडळ
  • लातूरचा राजा गणपती 
  • महाराजा गणपती
  • एकता गणेश मंडळ 
  • लातूरचा जागीरदार गणपती
  • काका गणेश मंडळ 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Ganesh Chaturthi 2023 : अनंत चतुर्दशीच्या दिवशी या शुभ मुहूर्तावर करा गणपतीचे विसर्जन, जाणून घ्या

[ad_2]

Related posts