अगदी हॉलिवूड कथानकासारखचं! 371 दिवस अंतराळात अडकलेला फ्रँक अखेर पृथ्वीवर परतला

( प्रगत भारत । pragatbharat.com)

NASA astronaut Frank Rubio : NASA  चेअंतराळवीर फ्रॅंक रुबिओने (Frank Rubio) 371 दिवस अंतराळात राहण्याचा विक्रम रचला आहे.  फ्रॅंक रुबिओसह एकूण 3 आंतराळवीर  इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरुन (International Space Station) पृथ्वीवर परतले आहेत. रॉस्कॉस्मॉसचं सोयूज स्पेस कॅप्सुलच्या ( Soyuz MS-23 spacecraft) मदतीने यांचे पृथ्वीवर लँंडिग करण्यात आले. तिघांनी अंतराळात 157.4 दशलक्ष मैलांचा तर, पृथ्वीच्या कक्षेपासून  5,963 ऑर्बिट इतका प्रवास केला आहे.

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरुन अनडॉकिंग केल्यानंतर तीन तासांनंतर डझेझकाझगन (Dzhezkazgan) शहराच्या आग्नेय दिशेला असलेल्या कझाकस्तानच्या वाळवंटात त्यांचे पॅरशुट उतरले. रिकव्हरी टीम येथे तैनात होती. लँडिंगनंतर फ्रॅंक रुबिओसह तीनही आंतराळवीरांनाची मेडिकल टेस्ट करण्यात आली, यानंतर कारागांडा, कझाकस्तान (Kazakhstan) येथे नेऊन नासाच्या विमानाने अमेरिकेत नेण्यात आले.  फ्रॅंक रुबिओसह, सेर्गेई प्रोकोपिएव्ह (Sergey Prokopyev ) आणि डिमिट्री पेटेलिन ( Dmitri Petelin) हे आंतराळवीर पृथ्वीवर परतले आहेत. 

पृथ्वीच्या ऑर्बिटरमध्ये 371 दिवस राहण्याचा विक्रम

नासाचे अंतराळवीर फ्रॅंक रुबिओने सर्वाधिक काळ अमेरिकन अंतराळ मोहिमेत वास्तव्य करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधील 69 व्या टीमचे ते सदस्य आहेत. फ्रॅंक रुबिओने पृथ्वीच्या ऑर्बिटरमध्ये 371 दिवस राहण्याचा विक्रम नोंद केला आहे. यापूर्वी सर्वाधिक वेळ अंतराळात राहण्याचा विक्रम नासा अंतराळवीर मार्क हेई याच्या नावावर होता. मार्क हेई 355 दिवस अंतराळात होता. 
2022 चा हा विक्रम फ्रॅंक रुबिओने मोडला आहे.

फ्रॅंक रुबिओने 21 सप्टेंबर 2022 पासून इंटरनॅशनल स्पेस स्टेशन कार्यरत

फ्रॅंक रुबिओ 21 सप्टेंबर 2022 रोजी  इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पोहचला होता. रुबिओ आणि त्याच्या क्रू मेट्सचे मार्च 2023 मध्ये पपृथ्वीवर परतणार होते. त्यांना परत आणण्यासाठी लाँच करण्यात  आलेल्या Soyuz MS-22 अंतराळ यानामध्ये कूलंट लीक झाल्यामुळे ही मोहिम रद्द झाली आणि पाच महिन्यांपेक्षा जास्त वेळ लांबणीवर पडली.

कोण आहे फ्रॅंक रुबिओ?

फ्रॅंक रुबिओ हा नासाचा आंतराळवीर आहे. चंद्र आणि मंगळ ग्रहावर मानवी मोहिम मोहिम राबवताना मानवी शरीर स्पेसफ्लाईटशी कशा पद्धतीने जुळवून घेऊ शकते यावर फ्रॅंकने संशोधन केले. फ्रॅंक रुबिओने सर्व प्रथम सहा महिन्यांसाठी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर वास्तव्याचा कालावधी निश्चित केला होता. मात्र, नंतर स्पेसक्राफ्ट मालफंक्शनसमोरील आव्हाने आणि संधी यावर अभ्यास करण्यासाठी त्याला मुदतवाढ देण्यात आली. 

Related posts