indias indri whisky brand awarded world best single malt 2023

( प्रगत भारत । pragatbharat.com)

BEST WHISKY IN THE WORLD: भारतातील एका व्हिस्की कंपनीचा ब्रँड जगात भारी ठरला आहे. ‘इंद्री दिवाळी कलेक्टर्स एडिशन 2023’ (Indri Diwali Collector’s Edition 2023)  भारतीय सिंगल माल्ट व्हिस्कीने 2023 व्हिस्की ऑफ वर्ल्ड अवॉर्ड्समध्ये ‘बेस्ट इन शो डबल गोल्ड’ पुरस्कार पटकावला आहे. भारतीय व्हिस्की (Whiskey) उद्योगासाठी ही एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे,  ‘बेस्ट इन शो डबल गोल्ड’ पुरस्कार हा जगातील प्रतिष्ठित पुरस्कार (Award) मानला जातो. 

इंद्री हा ब्रँड 2021 मध्ये लाँच करण्यात आला. आपल्या गुणवत्तेच्या आधारावर अल्पकाळातच इंद्री ब्रँडने बाजारात प्रतिष्ठा मिळवली. इंद्रीची दिवाळी कलेक्टर एडिशन ही एक सिंगल माल्ट व्हिस्की आहे. भारतीय सिंगल माल्चने स्कॉच, बोरबॉन, कॅनेडिअन, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटिश सिंगल माल्टसहित शेकडो आंतरराष्ट्रीय ब्राँडवर मात केली आहे. 

हरियाणातल्या पिकाडिली डिस्टलरीजचा स्थानिक ब्राँड असलेल्या इंद्रीने 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला प्रवास सुरु केला. इंद्री ट्रिनी या नावाने या ब्रँडची ओळख बनली. इंद्री व्हिस्कीने गेल्या दोन वर्षात 14 हून अधिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. नुकताच ‘व्हिस्की ऑफ द वर्ल्ड अॅवॉर्ड’ही जिंकला होता.

इंद्री कंपनीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. या पोस्टला 9000 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत इंद्री व्हिस्कीची किंमत वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळया किंमती आहेत. महाराष्ट्रात या व्हिस्कीच किंमत 5,100 रु इतकी आहे. तर हरियाणा, गोवा, उत्तरप्रदेश, दिल्ली आणि बंगरुळ या राज्यात या व्हिस्कीची किंमत 3,100 इतकी आहे. इंद्री ब्रँड भारतातल्या 19 राज्यासहित जगभरातील 17 देशांमध्ये उपलब्ध आहे. विशेष म्हणजे येत्या नोव्हेंबरपासून अमेरिका आणि काही युरोपियन देशांमध्येही ही व्हिस्की मिळणार आहे. 

इंद्री दिवाळी कलेक्टर एडिशन बनवण्याची पद्धतही खास आहे. भारतातल्या पारंपारिक तांब्याच्या भांड्यात संपूर्ण प्रक्रिया केली जाते. यात वेगवेळ्या प्रकारचे एक्स-बोरबॉन फर्स्ट-फिल, वर्जिन ओक, एक्स-वाइन आणि एक्स-शेरी पीपों यांचा समावेश केला जातो. दिल्लीत 750 एमएल बाटलीची किंमत 3700 रुपये इतकी आहे.

 

Related posts