( प्रगत भारत । pragatbharat.com)
NASA Rover Dust Strom : मंगळ(Mars) ग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी नासाने(National Aeronautics and Space Administration) विशेष मोहिम हाती घेतली आहे. NASA चा Perseverance Rover मंगळ ग्रहावर संधोन करत आहे. या रोव्हरने एका मोठ्या वादळाचा सामना केला आहे. प्रचंड वेगाने आलेल्या वादळाचा अभूतपूर्व क्षण NASA च्या रोव्हरवर बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याचा व्हिडिओ तुफना व्हायरल होत आहे.
मंगळग्रहावर राक्षसी वादळ
NASA च्या रोव्हरवरने कॅप्चर केलेला मंगळ ग्रहावरील वादळाचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. Mars dust devil अर्थात मंगळावर धुळीचा राक्षस असं कॅप्शन देत नासाने NASA’s Perseverance Mars Rover या सोशल मिडिया हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र, या वादळाचा Perseverance Mars Rover कोणताही परिणाम झालेला नाही.
मंगळ ग्रहावरील राक्षसी वादळ पाहून संशोधक अचंबित
नासाने GIF फॉरमॅटमध्ये हा व्हिडिओ शेअर केला आहे. मंगळ ग्रहावर निर्णाम झालेल्या धुळीच्या वादळाचा हा व्हिडिओ आहे. हे वादळ मंगळ ग्रहावर पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या वादळाचा वेग ताशी 19 किलोमीटर होता. 30 ऑगस्ट रोजी मंगळावरील थोरोफेरे रिजवरून वादळ जात असल्याचे दिसत आहे. धुळीने भरलेले हे वादळ जेझेरो क्रेटरच्या पश्चिम रिंगमधून हे वादळ आरपार जात आहे. 21 फ्रेम्सचा हा व्हिडिओ बनलेला आहे. प्रत्येक फ्रेम 4 सेकंदाची आहे. प्रत्यक्षात मात्र, या वादळाचा स्पीड 20 पट जास्त आहे. हे वादळ रोव्हरच्या थोरोफेअर रिजपासून 4 किलोमीटर अंतरावर होते. हे वादळ 60 मीटरपर्यंत वाहत आले. व्हिडिओमध्ये या वादळाचा फक्त खालचा भाग दिसत आहे. जो 118 मीटर आहे. तर हे वादळ सुमारे 2 किलोमीटर उंच झाले असल्याचा संशोधकांचा दावा आहे.
मंगळ ग्रहावर का निर्माण होतात वादळं?
मंगळग्रहावरील हवामान सौम्य आहे. जमीन आणि हवेतील तापमानातील फरक यामुळे येथे वादळ निर्माण होतात. पृथ्वीवरील चक्रीवादळांच्या तुलनेत ही वादळे लहान आणि अत्यंत कमकुवत असतात. Perseverance Rover मंगळाच्या उत्तर गोलार्धात फिरत आहे. सध्या तेथे उन्हाळा सुरू आहे.
Mars dust devil caught in action! This video, which is sped up 20 times, was captured by one of my navigation cameras. More on what my team is learning: pic.twitter.com/vRaAVszcm5
— NASA’s Perseverance Mars Rover (@NASAPersevere) September 29, 2023
मंगळ ग्रहावर ऑक्सिजनची निर्मीती
NASA चे Perseverance Rover हे मागील अनेक वर्षांपासून मंगळ ग्रहावर संशोधन करत आहे. Perseverance Rover मध्ये Moxie नावाचे पेलोड अर्थात उपकरण बसवण्यात आले आहे. या डिव्हाईसच्या मदतीने मंगळावर असलेल्या कार्बन डायऑक्साईडपासून ऑक्सिजन तयार करण्यात आले आहे.