Trending News : ‘तुमचा मृत्यू जवळ आला आहे’ पाम रीडरच्या भविष्यवाणी; चॉकलेट खाल्ल्यानंतर तरुणीचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Woman Dies After Eating Chocolate : जगभरात बरेच लोक ज्योतिषी, टॅरो कार्ड वाचक आणि हस्तरेखाशास्त्रज्ञांवर विश्वास ठेवतात. आपल्या वर्तमानकाळ आणि भविष्याची चिंतेतून अनेक लोक भविष्य सांगण्याकडे जातात. पण ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली फसवणूक आणि लूटमारी करतात. त्यामुळे या काही लोकांमुळे  ज्योतिषी, टॅरो कार्ड वाचक आणि हस्तरेखाशास्त्रज्ञांचं क्षेत्र बदनाम होतं. नुकतीच अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (palm reader predicted death and gifted chocolate after eating woman died viral news Trending now)

‘तुमचा मृत्यू जवळ आला आहे’

मीडिया रिपोर्ट्सनुसार एक तरुणी ऑगस्ट महिन्यामध्ये मॅसेओमध्ये असताना, रस्त्यावरुन हिंडत होती. त्यावेळी तिला एक वृद्ध महिला भेटली आणि तिने त्या तरुणीला थांबवलं. त्यानंतर तिचा हात हातात घेऊन म्हणाली, ऐक तुझा मृत्यू जवळ आला आहे आणि आता तू फक्त काही दिवस जगणार आहेस. त्यानंतर त्या वृद्ध महिलेने त्या तरुणीला एक चॉकलेट गिफ्ट दिलं आणि ती निघून गेली. त्यानंतर त्या तरुणीने ते चॉकलेट खाल्लं आणि तिचा मृत्यू झाला. 

ही धक्कादायक घटना ब्राझीलमधील तरुणीसोबत घडली आहे. तिचं नाव फर्नांडा वालोज पिंटो असं आहे. तिच्या चुलत बहीण बियान्का क्रिस्टिनाने पोलिसांनी ही माहिती दिली. त्यानंतर पोलीस त्या वृद्ध पाम रीडरच्या शोधात आहे. 

‘मला सगळं अस्पष्ट दिस आहे…’

बियान्का हिच्या म्हणण्यानुसार पिंटोने चॉकलेट खाल्ल्यानंतर तिने कुटुंबियांना मेसेज केला होता. मेसेजमध्ये तिने लिहिलं होतं की, ”एका वृ्द्ध महिलेने तिला एक चॉकलेट खायला दिलं होतं. ते खाल्ल्यानंतर तिला उलट्या होत आहे. मला सगळं अस्पष्ट दिसत आहे. मला अजिबात बरं वाटत नाही आहे. ”

‘मी पाण्याच्या टाकीत बसली आहे…’

त्यानंतर तिचा अजून एक मेसेज आल. ज्यामध्ये तिने लिहिलं होतं की, ”मला भूक लागली होती म्हणून मी ते चॉकलेट खाल्लं पण आता माझी तब्येत खराब झाली आहे. ते चॉकलेट खूप कडू होतं. ते खाल्ल्यानंतर उलटीसोबत माझ्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. माहिती नाही पण मी पाण्याच्या टाकीत येऊन बसली आहे. असं वाटतं आहे की, मी देवाजवळ आहे. सगळं कसं विचित्र वाटतं आहे.”

या मेसेजनंतर मी लगेचच तिच्याजवळ पोहोचली आणि तिला सांता कासा डी मिसेरिकॉर्डिया रुग्णालयात दाखल केलं. पण हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत पिंटोच्या नाकातून रक्त यायला लागलं होतं आणि तोंडातून फेस येत होता. तिला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले पण त्यांना अपयश आलं आणि पिंटोचा या घटनेत मृत्यू झाला. 

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा 

27 वर्षीय पिंटोच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा झाला आहे. चॉकलेटमध्ये सल्फोटेप आणि टेरबुकॉस यांचं प्रमाण सर्वाधिक होतं. हे दोन्ही रसायने ब्राझीलमधील सामान्यत: कीटकनाशक म्हणून वापरलं जातं. त्यामुळे पोलीस आता त्या पाम रीडरच्या शोधत आहे. 

 

Related posts