रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरने दान केला बोन मॅरो; शस्त्रक्रियेनंतर दिली हृदयस्पर्शी प्रतिक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Viral News : रुग्णांचे प्राण वाचवणं हे डॉक्टरांचे (Doctor) पहिलं काम असतं. मग शस्त्रक्रिया असो की औषधे गोळ्या काही करुन डॉक्टर त्याच्या रुग्णाला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. पण अमेरिकेतल्या एका डॉक्टरने यापेक्षाही पुढे जाऊन त्याच्या रुग्णासाठी काम केलं आहे. फ्लोरिडातल्या (Florida Doctor) एका डॉक्टरने एका रुग्णासाठी अवयवयदान केलं आहे. अमेरिकेतल्या या डॉक्टरने एका मुलाचा जीव वाचवण्यासाठी अस्थिमज्जा (बोन मॅरो) दान केल्याबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कोणतेही प्रयत्न करुन डॉक्टर त्याच्या रुग्णाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. तसाच काहीसा प्रकार अमेरिकेतील फ्लोरिडा येथे घडला आहे. फ्लोरिडा येथील एका डॉक्टराला फोन आली की त्याचा बोन मॅरो एका मुलाशी जुळत आहे. तेवढ्यात त्या डॉक्टराने बाळाचा जीव वाचवण्यासाठी त्याचा बोन मॅरो दान केला. डॉक्टरचा हा किस्सा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोक त्याच्या कामाचे खूप कौतुक करत आहेत.

गुडन्यूज मूव्हमेंट या इन्स्टाग्राम चॅनेलने या अमेरिकन डॉक्टरची गोष्ट सोशल मीडियाव शेअर केली आहे. गुडन्यूजने इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी स्पेशालिस्ट, एमडी, डॉ. अली अलसमारा यांची ही कौतुकास्पद गोष्ट देखील शेअर केली. डॉ. अलसामारा हे ओकाला, फ्लोरिडा येथील डॉक्टर आहेत. गुडन्यूजने दिलेल्या माहितीनुसार डॉ. अलसमारा यांचा फोन आला की त्यांचा बोन मॅरो एका आजारी मुलाशी जुळत आहे. मुलाला याची नितांत गरज आहे, असे डॉ. अलसमारा यांना सांगण्यात आले होते. डॉ. अलसमारा यांनी कसलाही विचार न करता त्यांचा बोन मॅरो दान करुन टाकला.

“मला थोडे दुखत आहे, पण मी मदत करू शकलो याचा आनंद आहे. माझा एक मित्र कर्करोगाने ग्रस्त होता आणि एका दात्याने त्याला मदत केली. मलाही यातून प्रेरणा मिळाली. माझ्यामुळे लोकांना इतरांना मदत करण्यासाठी आणि अवयव दान करण्यासाठी प्रेरणा मिळेल अशी आहे,” अशी हृदयस्पर्शी  प्रतिक्रिया डॉ. अलसमारा यांनी दिली आहे.

बोन मॅरो म्हणजे काय?

अस्थिमज्जा (बोन मॅरो) म्हणजे हाडांमधील जागा आहे जी लाल, पिवळ्या आणि पांढऱ्या रक्त पेशी तयार करते. लाल रक्त पेशी शक्ती देतात आणि पांढऱ्या रक्त पेशी रोगांशी लढण्यासाठी शक्ती देतात.

Related posts