( प्रगत भारत । pragatbharat.com)
Navratri Brothel Soil : सूर्यग्रहणानंतर 15 ऑक्टोबर 2023 ला संपूर्ण देशात शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. या नऊ दिवसात देवी मातेच्या नऊ रुपाची पूजा केली जाते. महाराष्ट्रात घरोघरी घटस्थापना केली जाते. महाराष्ट्रासोबतच उत्तर भारत आणि ईशान्य भागात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. (navratri 2023 why is durgas idol made from brothel mud)
दुर्गा पूजा पश्चिम बंगालमध्ये, विशेषतः कोलकातामध्ये मोठ्या थाटामाटात साजरी केला जातो. बंगाली समुदायात दुर्गापूजा म्हणजे त्यांच्यासाठी दिवाळीचा सण असतो. तुम्हाला माहिती आहे का, की दुर्गा देवीची मूर्ती (Durga Murti) बनवण्यासाठी गंगेची माती, गोमूत्र, शेण याला अतिशय महत्त्व आहे. पण वेश्यालयातील (soil of Red light area) मातीशिवाय ही मूर्ती अपूर्ण मानली जाते. पण काय आहे यामागील कारण याबद्दल आपण जाणून घेऊयात.
काय आहे यामागील परंपरा?
पारंपारिक श्रद्धेनुसार, ‘पुण्यमती’ किंवा पवित्र माती म्हणून ओळखल्या जाणार्या, सेक्स वर्करच्या हातून भिक्षा मागून ही माती भेट आणि आशीर्वाद म्हणून प्राप्त केली जाते. या मातीतून दुर्गा मातेची मूर्ती बनवली जाते. या मागे असं समज आहे की, जे लोक मग तो पुरुष असो किंवा महिला वेश्यांच्या निषिद्ध गल्लीत प्रवेश करतो तो आपले पुण्य आणि धार्मिकता दारात सोडून देहिक इच्छा आणि पापाच्या जगात प्रवेश करतो. त्यामुळे ही माती सर्व गुण आत्मसात करून धन्य होते. म्हणून वेश्यागृहाच्या दरातील माती पवित्र मानली जाते.
दुसरी कथा अशी आहे की, एक वेश्या माता दुर्गेची निस्सीम भक्त होती. पण तिचा समाजाकडून तिरस्कार होत होता. अशात एका ऋषींच्या स्वप्नात देवी प्रगट झाली. त्या देवीने ऋषीला स्वप्नात आदेश दिले वेश्यालयातील मातीचा वापर करुन देवीची मूर्ती बनव. अशाप्रकारे दुर्गा मातेने त्या वेश्याची भक्ती स्वीकार. तेव्हा पासून मूर्ती बनवण्यासाठी वेश्यालयातील मातीचा वापर केला जातो.
तर लोकांच्या मते वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांकडे वाईट नजरने पाहिलं जातं. या काळा समाजातील महिलांना वाळीत टाकलं जातं. या अंधारात महिला इच्छेने गेलेला नसतात. काही समाज कंटकांकडून त्या तिथे फेकल्या गेलेल्या असतात. अशावेळी दुर्गा पूजा निमित्ताने त्यांनाही समाजातील एक भाग म्हणून वावरता यावं असाही त्या मागील एक उद्देश आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा हा एक प्रयत्न आहे.