Congress Candidates First List Madhya Pradesh Chhattisgarh Telangana Vip Assembly Seats

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Congress Candidates First List Release : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Election 2023) पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress) कडून तीन राज्यांसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून मध्य प्रदेश (Madhya Pradesh), छत्तीसगड (Chhattisgarh) आणि तेलंगणा (Telangana) राज्यांसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने रविवारी, 15 ऑक्टोबरला उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 

काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जारी

काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर महत्त्वाच्या जागांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याचं कारण म्हणजे काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे काही दिग्गज नेते या जागांवर निवडणूक लढवणार आहेत. या जागांवर सहज विजय मिळेल, अशी काँग्रेसला आशा आहे. यामुळे तिन्ही राज्यांमध्ये सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा होईल, अशी काँग्रेसला अपेक्षा आहे. 

मध्य प्रदेशातील महत्वाच्या जागा

काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या यादीत मध्य प्रदेशातील छिंदवाडा जागा व्हीआयपी सीट मानली जात आहे. याचं कारण म्हणजे माजी मुख्यमंत्री कमलनाथ येथून निवडणूक लढवत आहेत. कमलनाथ यांच्या मतदारसंघात भाजपने विवेक बंटी साहू यांना तिकीट दिलं आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत कमलनाथ यांनी विवेक बंटी साहू यांचा 25 हजार मतांनी पराभव केला होता.

छत्तीसगडची व्हीआयपी जागा

मुख्यमंत्री भूपेश बघेल पाटण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री असलेले बघेल हे इथून तीन वेळा आमदार झाले आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी ही जागा 28000 मतांनी जिंकली होती. छत्तीसगडच्या या व्हीआयपी सीटशिवाय अंबिकापूर जागेचीही खूप चर्चा आहे. या जागेवरून काँग्रेसने उपमुख्यमंत्री टीएस सिंह देव यांना उमेदवारी दिली आहे. मागील निवडणुकीत टीएस सिंह येथे 40 हजार मतांनी विजयी झाले होते.

तेलंगणामधील चढाओढ

तेलंगणा राज्यात तीन व्हीआयपी जागा आहेत, ज्यासाठी काँग्रेसने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. SC उमेदवारांसाठी राखीव आंदोळे विधानसभा जागेवर काँग्रेसने सी. दामोदर राजा नरसिंह यांना तिकीट दिलं आहे. नरसिंह हे संयुक्त आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री होते आणि ते एक मोठा दलित चेहरा आहेत. ऑगस्टमध्येच त्यांना काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य करण्यात आलं.

तेलंगणाची दुसरी महत्वाची जागा मधीरा विधानसभा आहे. येथून भट्टी विक्रमार्का मल्लू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही जागा SC उमेदवारांसाठीही राखीव आहे. विक्रमार्का  काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते आहे. विक्रमार्का या मधीरामधून तीन वेळा आमदार झाले आहेत. दलित मते गोळा करण्याची जबाबदारी असलेल्या पक्षाचा मोठा चेहरा असल्याने काँग्रेसने त्यांना तिकीट दिलं आहे. तेही मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत सामील होऊ शकतो.

[ad_2]

Related posts