बँकेच्या लॉकरमध्ये काय काय ठेवू शकता, चावी हरवल्यास काय होईल? RBIचा नियम काय सांगतो, वाचा

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Bank Locker Rules: बँकाकडून ग्राहकांना लॉकरची सुविधा दिली जाते. या लॉकरमध्ये सोने-चांदी, प्रॉपर्टीचे कादगपत्रेसारख्या महत्त्वाच्या वस्तू ठेवल्या जातात. ज्या वस्तूंना अधिक सुरक्षेची गरज भासते त्यां लॉकरमध्ये ठेवल्या जातात. या लॉकरना सेफ डिपॉजिट लॉकर असे देखील म्हणतात. लॉकर वापरण्याच्या बदल्यात बँक वर्षाला तुमच्याकडून पैसे आकारतात. बँकेच्या लॉकरमध्ये सगळ्या मौल्यवान गोष्टी ठेवू शकतात असा अनेकांचा समज आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे नाहीये. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लॉकरमध्ये ठेवता येऊ शकत नाही. यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेचा नियम काय आहे हे जाणून घेऊया. 

बँकेच्या लॉकरमध्ये काय ठेवता येऊ शकते?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, विद्यमान लॉकर धारकांना देखील सुधारित लॉकर करार करावा लागेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुधारित लॉकर कराराची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२३ निश्चित केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, बँक लॉकरचा वापर केवळ वैध कारणांसाठीच केला जाऊ शकतो. दागिने, दस्तऐवज यासारख्या मौल्यवान वस्तू त्यात ठेवता येतात, पण रोख आणि चलन त्यात साठवता येत नाही.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटनुसार, तुम्ही लॉकरमध्ये रोख किंवा चलन ठेवू शकत नाही. याशिवाय शस्त्रे, स्फोटके, ड्रग्ज यासारख्या वस्तू कोणत्याही बँकेच्या लॉकरमध्ये ठेवता येणार नाहीत. सडण्यासारखी वस्तू असेल तर ती लॉकरमध्ये ठेवता येत नाही. एवढेच नाही तर कोणतीही रेडिएशन सामग्री किंवा कोणतीही बेकायदेशीर वस्तू किंवा भारतीय कायद्यानुसार बंदी असलेली कोणतीही गोष्ट बँक लॉकरमध्ये ठेवता येत नाही. बँक लॉकरमध्ये अशी कोणतीही सामग्री ठेवता येणार नाही, ज्यामुळे बँकेला किंवा तिच्या ग्राहकांना धोका निर्माण होऊ शकतो. 

बँकेचा लॉकर उघडण्यासाठी बँकेकडून दोन चाव्या दिल्या जातात. त्यातील एक चावी मॅनेजरकडे आणि एक चावी ग्राहकाकडे असते. जोपर्यंत दोन चाव्या लागत नाहीत तोपर्यंत लॉकर उघडणार नाही. पण जर लॉकरची एक चावी हरवली तर काय होतं?याबाबत नियम काय सांगतो वाचा. 

बँकेच्या लॉकरची चावी हरवली असेल तर सर्वप्रथम बँकेला त्याची माहिती द्यावी लागेल. याशिवाय चावी हरवल्याबद्दल एफआयआरही दाखल करावा लागेल. जर तुमच्या बँक लॉकरची चावी हरवली असेल तर दोन पर्याय आहेत.

पहिलं म्हणजे  बँकेने तुमच्या लॉकरसाठी नवीन चावी जारी केली पाहिजे. यासाठी बँक डुप्लिकेट चावी बनवेल. तथापि, डुप्लिकेट चावी बनवण्याचा धोका असा आहे की त्या लॉकरची डुप्लिकेट चावी बनवणारी व्यक्ती भविष्यात काहीतरी चुकीचे करू शकते.

दुसरा पर्याय म्हणजे, बँक तुम्हाला दुसरे लॉकर देते आणि पहिले लॉकर तोडले जाईल. लॉकर फोडल्यानंतर त्यातील सर्व सामग्री दुसऱ्या लॉकरमध्ये हलवली जाईल आणि त्याची चावी ग्राहकाला दिली जाईल. मात्र, लॉकर फोडण्यापासून ते लॉकर पुन्हा दुरुस्त करून घेण्यापर्यंत सर्व खर्च ग्राहकांना करावा लागतो. 

Related posts