एलियन करताहेत संपर्काचा प्रयत्न?, 8 अब्ज वर्षांनंतर ब्रह्मांडातून पृथ्वीवर पोहोचला रहस्यमयी संकेत

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mysterious Signal took 8 Billion Years to reach Earth: एलियन अस्तित्वात आहेत का? हा प्रश्न अजूनही जगासमोर आहे. अनेकदा विविध माध्यमातून एलियनबाबतच्या चर्चा समोर येत असतात. अशातच खगोलशास्त्रज्ञांना ब्रह्मांडातून आलेला एक रहस्यमय संकेत रेकॉर्ड केला आहे. या संकेत पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठीच आठ अरब वर्ष लागले होते. सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधननानुसार, ही एक फास्ट रेडिओ बर्स्ट म्हणजेच एफआरबी म्हणजेच खगोलीय घटना आहे. 

एफआरबी रेडिओ या लहरी तीव्र पण आकाराने लहान असतात. आपल्या मोबाइल फोनमधून किंवा मायक्रोव्हमधून निघणाऱ्या रेडिओ लहरींप्रमाणेच या आहेत. पण या लहरी अंतराळात अस्तित्वात असलेल्या स्त्रोतांपासून निर्माण होतात. एफआरबी हे अत्यंत दुर्लक्ष आहे. जगातील सर्वात संवेदनशील रेडिओ, टेलीस्कोप आणि कंप्यूटिंग सिस्टम असूनही शास्त्रज्ञांना एफआरबीचा शोध घेणे खूपच आव्हानात्मक आहे.  

स्विनबर्न युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या नवीन अभ्यासाचे लेखक रायन शॅनन यांनी न्यूज वीक या वृत्तसंस्थेला सांगितले की FRBs च्या माध्यमातून मिळणाऱ्या संदेशाचा एक सेकंडपर्यंतच फक्त एक छोटासा भाग टिकतो.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की बहुतेक FRB पुन्हा होत नाहीत, याचा अर्थ ते काय आहेत किंवा ते कोठून आले आहेत हे समजून घ्यायचे असेल, तर आपल्याला त्वरीत प्रतिक्रिया देणे आवश्यक आहे आणि ते पृथ्वीजवळून जात असताना एका सेकंदाच्या काही हजारव्या भागामध्ये ते शोधणे आवश्यक आहे. त्याबद्दल शक्य तितकी माहिती गोळा करावी लागेल.

नवीन संशोधनातून असे दिसून आले आहे की FRB, ज्याला FRB 20220610A म्हणूनही ओळखले जाते, हे आतापर्यंतचे रेकॉर्ड केलेला संदेश हा सर्वात विशिष्ट आणि प्राचीन आहे. हा विलक्षण एफआरबी सुमारे आठ अब्ज वर्षांपूर्वी उत्पन्न झाला होता. लेखकांच्या म्हणण्यानुसार ‘नवीन शोधामुळं ब्रम्हाडांबाबत नवीन माहिती मिळण्यास मदत होते. 

खगोलशास्त्रज्ञांनी आजपर्यंत फक्त 50 FRB शोधले आहेत. कमी नमुने उपलब्ध असल्याने, त्यांचा अभ्यास करणे खूप आव्हानात्मक आहे. काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की FRB चा उगम मॅग्नेटारपासून होतो, जे अतिशय उच्च चुंबकीय न्यूट्रॉन तारे आहेत. न्यूट्रॉन ताऱ्यांचा हा पुंजका असतो ज्यांचे वस्तुमान पृथ्वीच्या सूर्याइतकेच आहे. 

दरम्यान,  FRBचा स्त्रोत नेमका कोणता आहे ही अद्याप एक रहस्य बनले आहे. त्यांच्या उत्पत्तीचे कारण नेमके कोणते आहे हे ठरवणे खूप कठिण आहे. ऑस्ट्रेलियाचे एसकेए पाथफाइंडरने 10 जून 2022 मध्ये सगळ्यात नवीन एफआरबीचे शोध लावला होता. FRB 20220610A ने 30 वर्षांत सूर्यापेक्षा काही मिलिसेकंदांमध्ये जास्त ऊर्जा उत्सर्जित केली

Related posts