Gajkesari Yog : चंद्राच्या संक्रमणामुळे लवकरच गजकेसरी योग; राहू-केतूच्या संयोगामुळे ‘या’ राशींना आर्थिक फटका?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gajkesari Yog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रातील सर्वात प्रभावशाली आणि वेगवान ग्रह चंद्र आपलं स्थान बदलणार आहे. चंद्र येत्या बुधवारी म्हणजे 31 मे 2023 ला संध्याकाळी 6:29 ला तूळ राशीत प्रवेश करणार आहे. चंद्र हा एका राशीत एक तास ते 2.5 दिवस स्थानबद्ध असतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र सर्व 12 राशींतून 28 दिवसांत संचार करत असतो. जेव्हा चंद्र बुधवारी तूळ राशीत संक्रमण करेल तेव्हा गजकेसरी योग तयार होणार आहे. राहु केतू अक्षात हा गजकेसरी योग तयार होत असल्याने काही राशींसाठी तो वाईट दिवस घेऊन येणार आहे. 

चंद्र 31 मे 2023 रोजी संध्याकाळी 6.29 वाजता तूळ राशीत प्रवेश केल्यावर 3 जून 2023 ला दुपारी 12.28 वाजेपर्यंत तो या राशीत राहणार आहे. चला या दिवसांमध्ये कुठल्या राशींना सतर्क राहण्याची गरज आहे जाणून घेऊयात. (gajakesari yoga guru chandra gochar these zodiac signs will face bad effect )

मेष (Aries)

मेष राशीच्या लोकांवर या काळात अहंकार आणि मत्सर हावी होणार आहे. त्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. त्याशिवाय अतिआत्मविश्वासही या दिवसांमध्ये तुम्हाला घात ठरु शकतो. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.  समाजातील तुमच्या प्रतिष्ठेला तडा जाईल. 

कर्क (Cancer)

लोकांना अफाट व्यावसायिक यश मिळेल, तर दुसरीकडे या योगामुळे तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी संघर्षाचा सामना करावा लागू शकतो. या काळात बॉससोबत समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्हाला तुमची नोकरीही सोडावी लागेल. 

तूळ (Libra)

गजकेसरी योग हा तूळ राशीच्या लोकांसाठी खर्चिक ठरणार आहे. उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होणार आहे. तुमच्या मनात नकारात्मक भावना घर करणार आहे. तूळ राशीच्या लोकांच्या कुंडलीत गुरु आणि राहुमुळे विवाह ठरण्यात अडथळा येणार आहे. त्याशिवाय ज्यांचे लग्न ठरले आहेत, त्यांचा वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होतील. 

वृश्चिक (Scorpio)

गजकेसरी योग हा वृश्चिक लोकांसाठी अतिशय वाईट ठरणार आहे. कुठल्याही कामात नशीब तुम्हाला साथ देत नाही. जर तुमच्या आयात निर्यातीचा व्यवसाय असेल तर सावध राहा. कारण यात आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक किंवा धार्मिक कार्यात विघ्न येणार आहे. या काळात तुम्हाला पोटदुखीची समस्या होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत वाद होतील. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

 

Related posts