पगार कसा संपतो कळतंच नाही? सेव्हिंगचा 50-30-20 फॉर्म्युला लक्षात ठेवा!

( प्रगत भारत । pragatbharat.com)

50-30-20 Rule In Marathi: माणसाच्या गरजा वाढत गेल्या की खर्च ही वाढत जातो. पण खर्च भागवण्यासाठी अधिक मेहनत केली जाते किंवा पैसे मिळवण्याचे नवनवीन साधने शोधू लागतो. पैसे वाचवण्याचा व कमावण्याचा एक पर्याय म्हणजे गुंतवणुक. गुंतवणुकचेही अनेक पर्याय आहेत. एफडी, आरडी, म्युचुअल फंड, एसआयपी असे अनेक पर्याय आहेत. पण आज आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचा एक फॉर्म्युला सांगणार आहोत. तुमचा पगार झाल्यानंतर कुठे संपतो हे तुम्हालाही लक्षात येत नाही. अशावेळी हा 50-30-20 हा नियम लक्षात ठेवा.  

तुमचं महिन्याचे बजेट बनवत असताना नेहमी 50-30-20 हा नियम लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवल्यास तुम्ही चांगल्या पद्धतीने आर्थिक गुंतवणुक करु शकणार आहात. तुमच्या महिन्याच्या पगारातून घर खर्च भागवूनही उरलेल्या पैशात तुम्ही फिरु शकता व मजा-मस्तीदेखील करु शकता. काय आहे हा 50-30-20 फॉर्म्युला जाणून घेऊया. 

काय आहे नियम?

50-30-20 फॉर्म्युलाची सुरूवात सर्वात पहिले एलिजाबेथ वॉरेन यांनी केली आहे. या नियमाबाबत एका पुस्तकात उल्लेख केला आहे. एलिजाबेथ वॉरेन यांनी त्यांच्या मुलीसोबत 2006 साली All Your Worth: The Ultimate Lifetime Money Plan लिहलेल्या या पुस्तकात या नियमाची माहिती दिली होती. 

3 हिश्शात नियमाची विभागणी 

या नियमाची 3 हिश्श्यात विभागणी केली गेली आहे. यातील पहिला हिस्सा गरज, दुसरा हिल्ला आवड आणि तिसरा हिस्सा बचत असा आहे. 

50 टक्के हिस्सा

एलिझाबेथ वॉरेन यांच्या पुस्तकात दिल्याप्रमाणे, आपल्या मिळकतीतीत 50 टक्के हिस्सा हा आपल्या जीवानावश्यक गरजांवर खर्च केला पाहिजे. यात घराचे सामान, लाइट व इतर बील, मुलाच्या आभ्यासासंबधीत सर्व खर्च. उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या सर्व गरजांवर खर्च, इत्यादीचा यात समावेश आहे. 

30 टक्के हिस्सा

तुमच्या पगारातील 30 टक्के हिस्सा हा तुमच्या आवडी-निवडी जोपासण्यासाठी करा. म्हणजेच असे खर्च जे तुम्ही टाळू शकत नाही व यातून तुम्हाला आनंद मिळतो. उदाहरणार्थ, मुव्हि बघणे, फिरायला जाणे, सेल्फ केअर, शॉपिंग यावर करा. 

20 टक्के हिस्सा

पगारातील 20 टक्के मिळकतीवर तुम्ही बचत केली पाहिजे. या पैशांचा वापर तुम्ही रिटायरमेंटची प्लानिंग, मुलांचे शिक्षण आणि लग्न व काही आपत्कालीन गरज भासल्यास करु शकता. 

सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या पगाराचे गणित समजुन घेतले पाहिजे. त्यानंतर तुमचे रोजचे खर्च, गरजा आणि बचत यामध्ये विभागून घ्या. त्यानंतरच प्रत्येकासाठी 50 टक्के,30 टक्के आणि 20 टक्के विभागून घ्या. 

उदाहरण जाणून घ्या

असं समजा की प्रत्येक महिन्याला तुम्ही 50,000 रुपये कमावता. अशावेळी 50-30-20 नियमांनुसार, 50 टक्के म्हणजेच 25,000 रुपये घरखर्चासाठी यात तुमच्या घरासाठी लागणारे सर्व गरजांचा समावेश आहे. त्याचबरोबर 30 टक्के रक्कम म्हणजेच 15 हजार रुपये तुमच्या आवडी-निवडींवर खर्च करु शकता. व उर्वरित 20 टक्के म्हणजेच 10 हजार तुम्हाला बचत करायचे आहेत. या पैसे जमवून तुम्ही त्याची एफडी करु शकता किंवा एनपीएसमध्ये गुंतवणूक करु शकता किंवा एसआयपीदेखील करु शकता. 

Related posts