In the next year these zodiac signs will face crisis Lord Shani will have a gray eye

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Saturn Direct 2024 effect on Zodiacs: अवघ्या एका महिन्यातच नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. 2024 हे वर्ष त्यांच्यासाठी कसं असणार हे जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात आहे. ज्योतिष्य शास्त्रामध्ये शनी देव सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह मानला जातो. 

शनि न्यायाची देवता असल्याने कर्मानुसार फळ देतो. शनी सर्वात मंद गतीने चालतो आणि त्याच्या स्थितीतील बदलाचा प्रभाव लोकांवर दीर्घकाळ राहतो. अशा परिस्थितीत, 2024 मध्ये शनिची स्थिती सर्व 12 राशीच्या लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव टाकणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 2024 मध्ये शनि स्वतःच्या राशीत कुंभ राशीत असणार आहे. या राशीत ते मार्गस्थ झाले आहेत. अशावेळी काही राशींवर याची साडेसाती सुरु असणार आहे.

2024 मध्ये या राशींच्या व्यक्तींवर शनीची राहणार कडर नजर

कर्क रास

2024 मध्ये शनीच्या मार्गी स्थितीतमुळे या लोकांनी सावध राहावे. या काळात छोटीशी चूकही तुमचं मोठं नुकसान करू शकते. जोखमीचे काम करू नका. या राशीच्या व्यक्तींसाठी अडचणींचा काळ येणार आहे. व्यवसायात जास्त पैसे गुंतवणे टाळा.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीवरही सन 2024 मध्ये शनीच्या प्रभावाखाली असणार आहे. या काळात तुम्ही वाहन चालवताना काळजी घ्या. यावेळी घाईघाईत निर्णय घेऊ नका. मालमत्तेशी संबंधित आणि वाहनाच्या बाबतीत सावधगिरी बाळगावी लागणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे शत्रू तुम्हाला पराभूत करण्यासाठी नवीन मार्ग शोधतील.

मकर रास

मकर राशीच्या लोकांवर सन 2024 मध्ये शनीच्या साडेसातीचा प्रभाव राहणार आहे. या लोकांना संकटांपासून वाचवण्यासाठी उपाय करावे लागणार आहेत. वादविवाद आणि राग टाळा, अन्यथा तुम्ही एखाद्या समस्येत अडकू शकता. आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरं जावं लागणार आहे.

कुंभ रास

शनीच्या स्थितीमुळे हे लोक काही वादात अडकू शकतात. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यात अडकू नका. कोणाशीही वाद होऊ शकतो. या लोकांचा पैसा कुठेतरी अडकू शकतो. कोणाच्याही सल्ल्यावर लगेच विश्वास ठेवू नका.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts